शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

सावधान! पॉर्न साईट्स क्लिक करताय? गुन्हा दाखल होऊन अटकेतही जाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 17:08 IST

सायबर पोलिसांची करडी नजर : चाईल्ड पॉर्न व्हिडिओ व्हायरल केल्याने झाली होती अटक

सोलापूर : सध्या अल्पवयीन मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात ॲन्ड्रॉईड मोबाईल आला आहे. त्यामुळे त्यातील इंटरनेटचा वापर प्रत्येकाला पाहिजे तसा करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. मात्र, सावधान! पॉर्न व्हिडिओ जर सार्वजनिक ठिकाणी पाहात असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. सोलापुरात चाईल्ड पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल हाेऊन अटक झाली होती.

अशा कृत्यांवर सायबर सेलच्या पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.   पोर्नोग्राफी म्हणजे अश्लील चित्रपट आणि त्या संबंधित प्रकरणाशी भारतात कडक कायदे आहेत. अशा प्रकरणात गुन्हा दाखल करताना माहिती तंत्रज्ञान कायद्याबरोबर आयपीसीच्या विविध कलमांचाही समावेश केला जातो. तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे कायद्यामध्ये दुरूस्त्याही करण्यात आल्या आहेत. व्हिडिओ, ऑडिओ आणि इतर स्वरूपात अश्लील आणि लैंगीक शोषणाचा प्रसार करणारे साहित्य बनविणे, तसेच इतरांना पाठवणे हे पोर्नोग्राफी प्रतिबंधक कायद्याने गुन्हा आहे. अश्लील व्हिडिओ बनवणेही गुन्हा असून, चाईल्ड पोर्नोग्राफी बघणेही गुन्हा ठरवण्यात आला आहे. अलीकडच्या काळात चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रमाण वाढले आहे.

-------------

यानुसार होईल कारवाई....

याप्रकरणी आरोपी दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८मधील कलम ६७ (अ) भादंवि कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ अन्वये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याप्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला पाच वर्षांचा तुरूंगवास किंवा १० लाखाच्या दंडाची शिक्षा आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

...तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधा : उदयसिंग पाटील

० चाईल्ड पोर्नोग्राफी समाजासाठी धोकादायक असून, त्याचा प्रसार थांबला पाहिजे. चाईल्ड पोर्नोग्राफी कोणी पाहात असतील अन त्याचा व्हिडिओ जर इतरांना फॉवर्ड करीत असेल तर अशा लोकांची माहिती सायबर पोलिसांना द्यावी. संबंधित व्यक्तीवर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील दिला आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफीचा एक गुन्हा दाखल

० २०२१मध्ये सोलापुरातील एका तरूणाने चाईल्ड पोर्नोग्राफी इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. हा प्रकार दिल्ली येथील सायबर सेलच्या लक्षात आला होता. दिल्लीच्या सायबर सेलने तरूणाचा शाेध घेऊन साेलापूरच्या तरूणाला अटक करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलने तरूणावर कारवाई केली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस