शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बाथरूम सिंगरही आता गाईल सूर-तालात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 10:32 IST

सोलापुरात खास प्रशिक्षण मिळणार; ‘करा ओके’च्या माध्यमातून जोपासता येईल आवड

ठळक मुद्देप्रत्येकामध्ये एक गायक हा दडलेला असतो. त्यातील बहुतांश जणांचा आवाजही चांगला असतोफक्त गाण्याची संधी मिळत नाही तसेच धाडसही होत नाही. अशा बाथरुम सिंगरसाठी एक अनोखा उपक्रमगाण्याची आवड असणाºया हौशी कलाकारांसाठी आसरा चौक येथे प्रा. प्रशांत गोपाळे हे प्रशिक्षण देणार

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : प्रत्येकामध्ये एक गायक हा दडलेला असतो. त्यातील बहुतांश जणांचा आवाजही चांगला असतो. फक्त गाण्याची संधी मिळत नाही तसेच धाडसही होत नाही. अशा बाथरुम सिंगरसाठी एक अनोखा उपक्रम आपल्या सोलापुरात सुरू होतोय. गाण्याची आवड असणाºया हौशी कलाकारांसाठी आसरा चौक येथे प्रा. प्रशांत गोपाळे हे प्रशिक्षण देणार आहेत.

आपल्या कामाच्या व्यापातून अनेकांना गाण्याची आवड जोपासता येत नाही. संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी तितका वेळ द्यावा लागतो. संगीतामध्ये करिअर करावे अशी मानसिकता अजूनतरी आपल्यात आलेली नाही. यामुळे बºयाचदा आपल्या आवडीला मुरड घालावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना देखील गाण्याची आवड असते. अशाच मनापासून गाण्याची आवड असणाºयांना करा ओकेच्या माध्यमातून गीत म्हणण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

मला गाणं म्हणायला लहानपणापासूनच आवडत होते. वर्गातही मी गाणं म्हणायचो. शिक्षकही माझ्या गाण्याचे कौतुक करायचे. सातवीत असताना १५ आॅगस्टला शाळेच्या कार्यक्रमात गायची संधी मिळाली. वर्गात चांगलं गाणं म्हणणारा मी सर्वांसमोर मात्र घाबरुन गाणं व्यवस्थित म्हणू शकलो नाही. माझा आवाज कापत होता. कशीबशी मी वेळ मारुन नेली. या गोष्टीमुळे मला वाईट वाटले; मात्र यातून धडा घेतला असून आता गाण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत असल्याचे प्रा. गोपाळे यांनी सांगितले. 

करा ओके म्हणजे काय ?गाणे म्हणताना त्याला संगीताची जोड असते. मात्र प्रत्येक ठिकाणी वाद्यवृंद असतोच असे नाही. तशात वाद्यवृंदासोबत गाणं म्हणणे नवख्या गायकाला अवघड जातं. त्यांच्यासाठी करा ओके हा प्रकार फार फायदेशीर आहे. यात गाण्यामध्ये शब्दांऐवजी फक्त संगीत असते त्याला इन्स्ट्रुमेंटल असेही म्हणतात. त्या संगीतावर आपण गाणे म्हणू शकतो. अशी गीते म्हणण्यासाठी देखील थोड्याशा प्रशिक्षणाची गरज असते.

आपल्या आॅफिसमध्ये तसेच इतर ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात. ज्यांना गाणे म्हणण्याची आवड आहे, तसेच त्यांचा आवाजही चांगला आहे. असे लोक कार्यक्रमात गाणं म्हणायला घाबरतात. आपण गाणं चुकलो तर लोक आपल्यावर हसतील यांची त्यांना भीती असते. असे अनेक कलाकार आपल्यामध्ये दडलेले असतात. अशा कलाकारांना त्यांची हौस भागवता यावी म्हणून आमचा छोटा प्रयत्न आहे.- प्रा. प्रशांत गोपाळे, गायक

टॅग्स :Solapurसोलापूरmusicसंगीतmusic dayसंगीत दिन