शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सोलापूरमधील  केगाव येथील अपघातात वडवळचे पिता-पुत्र ठार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 17:36 IST

सोलापूरहून वडवळकडे मोटारसायकल वरून येताना थांबलेल्या ट्रकवर मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात वडवळ ता मोहोळ येथील पिता-पुत्र ठार झाले. अण्णासाहेब मोरे(वय-४५) व संग्राम अण्णासाहेब मोरे वय(२१) अशी या पिता पुत्रांची नावे आहेत.  

सोलापूर, दि. २२ -  सोलापूरहून वडवळकडे मोटारसायकल वरून येताना थांबलेल्या ट्रकवर मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात वडवळ ता मोहोळ येथील पिता-पुत्र ठार झाले. अण्णासाहेब मोरे(वय-४५) व संग्राम अण्णासाहेब मोरे वय(२१) अशी या पिता पुत्रांची नावे आहेत.  सिव्हिल पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडवळ येथील अण्णासाहेब मोरे व संग्राम मोरे हे सोलापूरहून वडवळकडे जाताना त्यांची दुचाकी एम एच १३ सी आर ६१७० डाळिंब संशोधन केंद्र केगाव ता उत्तर सोलापूरजवळ थांबलेल्या ट्रकवर आदळली यावेळी संग्राम मोरे हा मोटार सायकल चालवीत होता त्याच्या पाठीमागे वडील अण्णासाहेब मोरे बसले होते यावेळी जोरदार धडक बसल्याने वडील अण्णासाहेब मोरे हे जागीच ठार झाले तर मुलगा संग्राम हा सोलापूर येथे उपचारास नेल्यानंतर मरण पावला. अण्णासाहेब मोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे वडवळ येथील नागनाथ मंदिरा समोर हे पिता पुत्र नारळ पेढे विक्रीचा व्यवसाय करीत होते. वडील अण्णासाहेब मोरे यांच्या डोळ्यांच्या आजारपणासाठी संग्राम त्यांना सोलापूर ला घेऊन गेला होता. दवाखाना आटपून पुन्हा गावाकडे येताना हा अपघात घडला. 

एकाच आठवड्यात तीन जणांचा अपघाती मृत्यू, वडवळ गावावर शोककळामागील आठवड्यात १४ सप्टेंबर रोजी वडवळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विजय कुमार चव्हाण यांचा पोलिसाच्या कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता. ही घटना घडून आठ दिवस झाले नाही तर आज पिता पुत्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने वडवळ गावा वर शोककळा पसरली आहे.  शोकाकुल वातावरणात या पिता पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघात