शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

बार्शी तालुक्यात पंचावन्न वर्षांत सहा जणांना सत्तेचा वाटा

By admin | Updated: January 24, 2017 20:04 IST

बार्शी तालुक्यात पंचावन्न वर्षांत सहा जणांना सत्तेचा वाटा

बार्शी तालुक्यात पंचावन्न वर्षांत सहा जणांना सत्तेचा वाटाशहाजी फुरडे-पाटील - बार्शीसन २००२ साली पहिल्यांदा पंचायत समिती ताब्यात घेतलेल्या राजेंद्र राऊत यांनी दोन वर्षांत विधानसभेची निवडणूकही जिंकली व आमदार झाले. पुढे २००७ व २०१२ साली झालेल्या दोन्ही निवडणुकांत राजेंद्र राऊत यांच्याच नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादीचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा सत्ता ताब्यात घेतली़ पंचावन्न वर्षांच्या कालावधीत सहा जि़ प़ सदस्यांना विविध विषय समित्यांचे सभापती व विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ अध्यक्षपदाची माळ मात्र बार्शी तालुक्याच्या नशिबी कधीच आली नाही.२००७ मध्ये काँग्रेसच्या ९ तर राष्ट्रवादीच्या ३ जागा प़ंस मध्ये तर जि़प़च्या पाच जागा या काँग्रेसला व १ जागा राष्ट्रवादीला मिळाली़ पहिल्या अडीच वर्षांसाठी सभापती म्हणून उपळे दुमालाच्या इंदुमती बुरगुटे व उपसभापती युवराज काटे तर पुढे अडीच वर्षांपासून सभापती म्हणून खामगावचे युवराज काटे तर उपसभापती म्हणून पांगरीचे विजय गरड यांनी काम पाहिले़ २०१२ च्या निवडणुकीत राजेंद्र राऊत विरुद्ध आ़ दिलीप सोपल अशी पारंपरिक लढत झाली यामध्ये शिवसेनेच्या सात तर राष्ट्रवादीच्या पाच पंचायत समितीच्या जागा आल्या़ जि़प़ मध्ये शिवसेनेने पाच तर राष्ट्रवादीने एक जागा मिळवली़ पहिल्या अडीच वर्षांसाठी पांगरीच्या कौशल्या माळी सभापती तर नारीचे केशव घोगरे हे उपसभापती झाले़ त्यानंतर सव्वा वर्षे दहिटणेचे भाऊसाहेब काशीद व सध्या झरेगावचे लक्ष्मण संकपाळ हे सभापती म्हणून तर कळंबवाडीचे खुशाल मुंढे हे उपसभापती म्हणून काम पाहत आहेत़--------------------शहरातील नेत्यांच्या हातातच ग्रामीण भागाचीही सूत्रे ४आजवर ग्रामीण भागातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जायच्या; मात्र आ़ दिलीप सोपल, पुन्हा राजेंद्र राऊत यांनी पं़स़ व जि़प़ च्या निवडणुकीतही तालुक्याचे नेतृत्व करु लागले़ आमदार झाल्यानंतर दिलीप सोपल यांनी दहा वर्षे पंचायत समितीची सत्ता मिळवली व पुढे त्यानंतर सलग पंधरा वर्षे राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे़ ग्रामीण भागातील नेत्यांचे वर्चस्व कमी होऊन हे दोन्ही नेते एकहाती तालुक्याचे राजकारण करु लागले़ -------------------------हे झाले जि. प. चे सभापती ४जि़ प़मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील अध्यक्ष असताना ७२ ते ७९ या काळात बाबुराव पाटील गाडेगावकर हे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती होते़ तसेच यानंतर देखील चाऱ्याचे टी़एऩपाटील हे ७९ ते ९० या अकरा वर्षांसाठी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती होते़यानंतर ९२ ते ९७ याकाळात कोरफळेचे कौरव माने हे जि़प़चे उपाध्यक्ष झाले ़ते १७ वर्षे जि़प़सदस्य होते़तर काटेगावचे रघुनाथ कोल्हे देखील २००५ ते २००७ या अडीच वर्षांच्या काळासाठी अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती होते़विद्यमान कालावधीत वैरागचे मकरंद निंबाळकर यांनी अडीच वर्षे जि़प़चे पक्षनेतेपद व सध्या आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती म्हणून काम पहात आहेत़ या शिवाय याच कालावधीत चारेचे संजय पाटील यांनी जि़प़चे विरोधी पक्षनेते म्हणून ही काम केले़ ------------------------तालुक्याला जि़ प़ अध्यक्षपद केव्हा मिळणार जि़प़ च्या पंचावन्न वर्षांच्या वाटचालीत बार्शी तालुक्याला कौरव माने यांच्या रुपाने एकदा उपाध्यक्षपद मिळाले; मात्र या कालावधीत तालुक्याला एकदाही लाल दिवा म्हणजे जि़प़ चे अध्यक्षपद मिळालेले नाही़ तालुक्याबरोबरच जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आ़ दिलीप सोपल व आता जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे शिवसेनेचे राजेंद्र राऊत यावेळेस तरी तालुक्याला जि़प़चे अध्यक्षपद मिळवून देण्यात यशस्वी होतात की नाही हे लवकरच कळणार आहे़ -----------------------पं. स. सभापती व उपसभापती ४आनंदराव पाटील, किसनराव देशमुख, महादेव जगताप, निवृत्ती करळे, सुरेश गाढवे, सुनीता गांधी, भीमराव जामदार, कृष्णात घुगे, राजेंद्र महाडिक,विनायक विधाते, रतन कांबळे, इंदुमती बुरगुटे, युवराज काटे, कौशल्या माळी, भाऊसाहेब काशीद, लक्ष्मण संकपाळ यांनी सभापती तर माणिकराव गरड, शिवाजीराव पाटील, भागवत गिराम,सुखदेव चिकणे, राजेंद्र महाडिक,मधुकर कदम, चिमू पाटील, बापूसाहेब बुरगुटे, युवराज काटे, विजय गरड,केशव घोगरे व खुशाल मुंढे यांनी उपसभापती म्हणून काम पाहिले़ -----------------------जि़ प़ सदस्य ते आमदार ४पंचायत समितीचे सभापती असलेले किसनराव देशमुख व जि़प़सदस्य असलेले चंद्रकांत निंबाळकर हे दोन स्थानिक स्वराज्य संस्थेतून थेट विधानसभेत जाऊन आमदार झाले़तर जि़प़ सभापतीपदानंतर विधानसभा लढलेले बाबुराव पाटील हे मात्र पराभूत झाले़