शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी-सोलापूर रस्ता पडला बंद; सौंदरे जवळील रस्ता पावसाच्या पाण्यात गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 12:56 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

बार्शी - बार्शी शहर व परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने बार्शीच्या तिन्ही बाजूंच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सोलापूर रस्त्यावर शहरापासून काही किमी अंतरावर असलेला सौंदरे गावाच्या अलीकडील पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या प्रवासासाठी तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने मध्यरात्री पासून मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. तर बार्शी लातूर रोडवरील लक्ष्मीनगर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने बार्शी लातूर रोड वरील वाहतूक ही रात्रभर बंदच होती. बार्शी तुळजापूर रस्त्यावर असलेला कदमवस्ती येथील रस्ता ही खचला आहे.

बार्शी-सोलापूर रोडचे काम सुरू आहे. शनिवारी रात्रीच्या पावसामुळे सौंदरे शिवारातील सर्व पाणी या पुलातून जाते मात्र पुलाचे काम सुरू असल्याचे तात्पुरता तयार केलेला रस्ता खचला त्यामुळे मध्यरात्री पासून वाहतूक ठप्प झाली आहे. केवळ छोटी व दुचाकी वाहने ये-जा करत आहेत. लातूर रोडवर ही मोठ्या प्रमाणावर पुलावरून पाणी वाहत असल्याने लक्ष्मी नगरचा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे रात्रभर वाहतूक बंद होती. सकाळी पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली. सौंदरे येथील रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्याठिकाणी मुरूम टाकून रस्ता भरण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसbarshi-acबार्शीroad safetyरस्ते सुरक्षा