शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सोपलांनी बदलला पक्ष.. बार्शीकरांनी बदलला आमदारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:06 IST

Barshi Vidhan Sabha Election Results 2019: बार्शी विधानसभा मतदारसंघात फेºयानिहाय उत्कंठा: फटाके  अन् विजयाच्या जल्लोषाने राजाभाऊ राऊतांचे कार्यकर्ते आनंदले

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांना १६ हजार ११९ तर अपक्ष विशाल कळसकर यांच्या रोडरोलरला ११ हजार ४२७ मते मिळाली राऊत यांचे चिन्ह व रोडरोलर या चिन्हांमध्ये साधर्म्य असल्यामुळे राऊत यांचा कमी मतांनी विजय झालाफेरीनिहाय उत्कंठा वाढत होती. अखेर विजयानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला

भ. के. गव्हाणे/ शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी: बार्शी विधानसभेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र्र राऊत यांनी ९५,४८२ मते घेत त्यांचे पारंपरिक विरोधक शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल (९२,४०६) यांचा ३,०७६ मतांनी पराभव करुन १० वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आमदारकी आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांना १६ हजार ११९ तर अपक्ष विशाल कळसकर यांच्या रोडरोलरला ११ हजार ४२७ मते मिळाली. राऊत यांचे चिन्ह व रोडरोलर या चिन्हांमध्ये साधर्म्य असल्यामुळे राऊत यांचा कमी मतांनी विजय झाला. फेरीनिहाय उत्कंठा वाढत होती. अखेर विजयानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला.

उपळाई रोडवरील शासकीय धान्य गोदामात सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप शेलार, अभय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. एका बाजूला पोस्टल व सैनिक मतांची मतमोजणी सुरु होती तर दुसरीकडे १४ टेबलांवर ईव्हीएमची मतमोजणी सुरु होती. पहिल्या फेरीत उत्तर बार्शी भागातील उपळाई जिल्हा परिषद गटातील गावांचा समावेश असलेल्या भागातून ३६८ मतांची आघाडी अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली. ही आघाडी सहाव्या फेरीपर्यंत हळूहळू वाढत जाऊन ती ४,७१० मतांपर्यंत पोहोचली होती.

सातव्या फेरीला बार्शी शहरातील मतमोजणीला सुरुवात झाली. यात १,५५२ मते शिवसेनेचे दिलीप सोपल यांनी जास्त घेतल्याने राऊत यांची आघाडी हळूहळू कमी होऊ लागली. संपूर्ण शहराची मतमोजणी होईपर्यंत राऊत यांची आघाडी कमी करुन दिलीप सोपल दहाव्या फेरीअखेर ४,८६९ मतांनी राऊत यांच्यापेक्षा पुढे गेले.

मात्र पुन्हा अकराव्या फेरीपासून राऊत यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. अकराव्या फेरीत ५३२ मतांची आघाडी घेऊन सोपल यांचे मताधिक्य कमी करण्यात यश मिळविले. यानंतर राऊत यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक फेरीगणिक राऊत यांना ३०० ते ५०० मतांची आघाडी मिळत गेली. मात्र या जोडीला अपक्ष उमेदवार कळसकर यांच्या रोडरोलरलाही प्रत्येक फेरीला ५00 मते मिळू लागल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढू लागली होती. मतमोजणी प्रतिनिधींनाही घाम फुटू लागला. १७ व्या फेरीत राऊत यांनी वैराग भागातील उपळे दुमाला गणात समावेश असलेल्या गावांतून चांगले मताधिक्य मिळाल्याने तब्बल १२६४ मतांची आघाडी घेतली तर १८ व्या फेरीपासून सोपल यांचे मताधिक्य कमी करत त्यांच्यापेक्षा ७९८ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी   शेवटच्या २४ व्या फेरीपर्यंत हळूहळू वाढतच गेली व २४ व्या फेरीअखेर राजेंद्र राऊत हे ९३ हजार ९६१ मते घेऊन सोपल (९१ हजार ३१६) यांच्यापेक्षा २,६४५ मतांनी पुढे असल्याचे निश्चित झाले व मतमोजणी केंद्रात असलेल्या राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदात उड्या मारण्यास सुरुवात केली. बाहेरही कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला. सोपल गटाच्या कार्यकर्त्यांनी हळूहळू मतदान केंद्रातून काढता पाय घेतला. सायंकाळपर्यंत पोस्ट मतांची मोजणी सुरु असल्याने विजयाचा नेमका आकडा समजू शकला नाही. तरीदेखील पोस्टल मतांमध्येही राऊत यांनी आघाडी घेतल्याचे वृत्त आहे.

...म्हणून राऊतांचे मताधिक्य घटले- राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांना १५ हजार ९१५ मते मिळाली तर राजेंद्र राऊत यांच्या ट्रॅक्टर चिन्हाला साधर्म्य असलेल्या विशाल कळसकर यांच्या रोडरोलरला ११ हजार ४२७ मते पडली. या दोघांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांकही एकाखाली एक असल्याने राऊत यांच्या ट्रॅक्टर चिन्हाकडे जाणारी मते रोडरोलरला पडल्याने राऊत यांचे अधिकृत मताधिक्य कमी झाले. अन्यथा राऊत यांचा विजय हा १४ हजार मतांनी झाला असेच म्हणावे लागेल.

सोपल वगळता सर्वांची अनामत जप्त- पोस्टल मतांमध्ये दिलीप सोपल यांना १,०९० मते, निरंजन भूमकर यांना २०४ तर राजेंद्र राऊत यांना १,५२१ मते मिळाली. म्हणजे पोस्टल मतांमध्ये राऊत यांनी ४३१ मतांची आघाडी घेतली. दिलीप सोपल वगळता उर्वरित सर्व १२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत.

क्षणचित्रे 

  • - मतमोजणी सुरु झाल्यापासून अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत हे मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते. याशिवाय बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, अभिजित राऊत, विजय राऊत हे  राऊत परिवारातील सदस्य मोजणी केंद्रात आकडेवारी घेण्यात व्यस्त होते.
  • -  मागील दोन विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांना तिसºया उमेदवाराचा फायदा झाल्याने विजय सोपस्कर केला होता. यावेळी मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा उमेदवार अडचणीचा ठरला व त्यांना ३ हजार मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
  • - विजय निश्चित झाल्यानंतर राजेंद्र राऊत तत्काळ भोजन कक्षात जाऊन पोटाला आधार देत थोडेसे खाल्ले.

बार्शीकर जनतेने मला विजयी केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या विरोधकांनी कुटील कारस्थाने करुन आमच्या चिन्हासारखे चिन्ह घेऊन रडीचा डाव खेळला. मात्र तो यशस्वी झाला नाही. यापुढे बार्शी तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे. आम्ही आयुष्यभर जनतेची सेवा करणार असून, जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करु. तसेच शहराचाही विकास करण्यास कटिबद्ध आहे. शेतकºयांची मान कधी खाली जाऊ दिली जाणार नाही. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना पाणी देऊन तालुका पाणीदार करु व यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करु.- राजेंद्र राऊत, विजयी उमेदवार

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकbarshi-acबार्शीDilip Sopalदिलीप सोपल