शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

‘माने’ अखेर ‘यशवंत’ ठरले, विजयाचे शिल्पकार ‘अनगर’च बनले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 12:30 IST

Mohol Vidhan Sabha Election Results 2019: मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विजयाची परंपरा कायम : मोहोळमध्ये २१,६९९ मतांनी राष्ट्रवादी विजयी

ठळक मुद्देमोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणून आपला एकनिष्ठपणा अभेद्य ठेवला़या निवडणुकीत यशवंत माने यांना ९०,५३२ मते मिळाली़ २१ हजार ६९९ चे मताधिक्यगेल्या पंचवीस वर्षांतील मोहोळवरचे वर्चस्व शाबूत ठेवण्यात पुन्हा एकदा राजन पाटलांनी यश मिळवले

अशोक कांबळे

मोहोळ : देशात अन् राज्यात भाजपची सत्ता, जिल्ह्यात शिवसेना-भाजपकडे गर्दी असताना मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणून आपला एकनिष्ठपणा अभेद्य ठेवला़ या निवडणुकीत यशवंत माने यांना ९०,५३२ मते मिळाली़ २१ हजार ६९९ चे मताधिक्य मिळवून  गेल्या पंचवीस वर्षांतील मोहोळवरचे वर्चस्व शाबूत ठेवण्यात पुन्हा एकदा राजन पाटलांनी यश मिळवले आहे़ माने यांच्या विजयाचे शिल्पकार अनगरकर बनले आहेत.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला येथील शासकीय गोडावूनमध्ये गुरुवारी सकाळी आठ वाजता निवडणूक निरीक्षक चंद्रपाल तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली़ १४ टेबलांवरुन २४ फेºया पार पडल्या़ प्रारंभी पोस्टल मते मोजली आणि त्यानंतर सिद्धेवाडीपासून मतमोजणीला सुरुवात झाली़ आष्टी जिल्हा परिषद गट, अनगर जिल्हा परिषद गट, नरखेड जिल्हा परिषद गट या  तिन्ही गटात पाचव्या फेरीअखेर राष्टÑवादीचे उमेदवार यशवंत माने यांना १३ हजार ५९० मतांची आघाडी मिळाली़ मोहोळ शहर भागात सहाव्या फेरीत शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांना १,६५० मतांची आघाडी मिळाली होती. शेवटच्या बुथपर्यंत उत्तर सोलापूर व पंढरपूर या भागातूनही राष्ट्रवादीला आघाडी मिळत राहिली़ ही घोडदौड २१ हजार ६९९  मतापर्यंतही चालू राहिली.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुरुवातीपासूनच आघाडी मिळत राहिली आणि बाहेर कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरू झाला़  अनगर येथे माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी विजयी उमेदवार यशवंत माने यांचा सत्कार केला. या निकालामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सूर्यवंशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य येळे, बाळासाहेब जाधव, निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, लीना खरात, सुरेश गायकवाड, मोईन डोणगावकर, मनोज पुराणीक, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी वारगड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

उमेदवारांना मिळालेली पोस्टल मते 

  • - प्रेमनाथ सोनवणे - ४  
  • - यशवंत माने - ६८७
  • - डॉ. हनुमंत भोसले - ५
  • - नागनाथ क्षीरसागर - ४३७ 
  • - कृष्णा भिसे - १
  • - गौतम वडवे - ३३
  • - अतुल मोरे - १
  • - रमेश कदम - ७६
  • - मनोज शेजवाल - ८
  • - संजय खरटमल - २
  • - नोटा - ४ 

  उमेदवारनिहाय पडलेली मते - यशवंत माने (राष्ट्रवादी) - ९०,५३२ - नागनाथ क्षीरसागर (शिवसेना)- ६८,५३४- रमेश कदम (अपक्ष) - २३,५९७ - मनोज शेजवाल (अपक्ष)- ३, ८१६ - गौतम वडवे (वंचित आघाडी) - ६,४२३ - डॉ़ हनुमंत भोसले (मनसे) - १,४६६ 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकmohol-acमोहोळ