शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बापरे... मृत्यूच्या घोळाबाबत सोलापुरातील आरोग्य अधिकाºयाला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 08:21 IST

विभागीय आयुक्तांच्या बैठकीसाठी चुकीची माहिती दिल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई...!

ठळक मुद्देनोटीस मिळाल्यावर महापालिकेला आली जाग, तब्बल ३५ मृत्यूची झाली नोंदमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर : कोरोनाने मृत्यू पावलेल्या आकडेवारीबाबत खुलासा सादर करावा अशी नोटीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांना बजाविल्यावर धावपळ उडाली अन सोमवारी तब्बल ३५ मृतांची नव्याने नोंद घेण्यात आली आहे. 

कोरोना साथीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे २३ जून रोजी सोलापूर दौºयावर येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाने मृत पावलेल्यांची आकडेवारी मागविली होती. २१ जून रोजी महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या १९६ इतकी दाखविली आहे. पण कोव्हिड पोर्टलवर ही आकडेवारी १६१ दाखवित होती. कोरोनाने १९६ मृत्यू झालेले असताना पोर्टलवर चुकीची आकडेवारी का दाखविली याचा खुलासा करावा व १९६ मृत्यूच्या अनुषंगाने मृत्यूचा आॅडिट रिर्पोट सादर करावा आणि पोर्टलवरील माहिती आद्ययावत करावी असे २२ जून रोजी दिलेल्या नोटीशीत नमूद केले आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही नोटीस दिल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागात धावपळ उडाली. पोर्टलवर माहिती अपलोड करणाºया डॉक्टरांनी माहितीच भरली नसल्याचे उघड झाले आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशकर यांनी याची दखल घेत माहिती न भरणाºया डॉक्टरांना नोटीस बजावली. पण अचानक आकडेवारीत वाढ झाल्याने सोलापुरात हा चर्चेचा विषय झाला आहे. खाजगी हॉस्पीटलकडून आलेल्या मृताची वेबसाईटवर नोंद दाखविली गेली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र मृत्यू झाल्यानंतर अनेकांचा अंत्यविधी झाला तरी त्या मृत्यूची घोषणा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकाºयांचे स्पष्टीकरणमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आकडेवारीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने शोध घेतल्यावर सोलापुरातील आकडेवारीत ५१ ने वाढ असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी या वाढीव आकडेवारीचा इन्कार केला होता. जिल्हा प्रशासनाने पारदर्शकपणे हॉस्पीटलकडून येणारी खरी माहिती प्रसिद्ध केल्याचा दावा केला होता. पण आता महापालिकेतील गोंधळामुळे काही नावाची नोंद झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर या गोंधळाची कशी दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे बुधवारी फडणवीस सोलापूर दौºयावर आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका