शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

 बाळूमामाचं चांगभलं... म्हणत अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

By दिपक दुपारगुडे | Updated: August 9, 2023 18:28 IST

आरोपी रुईया ऊर्फ सूरज जाधव याला बाळूमामाचं चांगभलं म्हणत घेराव घालत ठोंबरेवाडी, लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथून ताब्यात घेतले.

सोलापूर : भक्तिमय वातावरणात बाळूमामाच्या मेंढरांच्या तळावर रंगलेल्या कीर्तन सोहळ्यात धोतर, घोंगडी, कपाळी भंडारा लावलेल्या पोलिसांनी सापळा रचून ७ ठिकाणच्या पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांत गेल्या अनेक दिवसांपासून हवा असलेला आरोपी रुईया ऊर्फ सूरज जाधव याला बाळूमामाचं चांगभलं म्हणत घेराव घालत ठोंबरेवाडी, लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथून ताब्यात घेतले.

दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली व कोयत्याने चेहऱ्यावर, दोन्ही हातांवर व दोन्ही पायांच्या गुडघ्याच्या खाली नडगीवर वार करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद रुईया ऊर्फ सूरज जाधव (रा. जाधववाडी, ता. माळशिरस) व अजय आढाव (रा. मेडद, ता. माळशिरस) यांच्या विरुद्ध माळशिरस पोलिसांत होती.

सहा ठिकाणच्या गुन्ह्यातील आरोपी जाळ्यातमाळशिरस नातेपुते ३ गुन्हे, सांगोला २ गुन्हे, (जि. सोलापूर) लोणंद १, म्हसवड १, फलटण १ (जि.सातारा) यवत १ (जि.पुणे) असा एकूण ९ पोलिसांना हवा असल्यामुळे पोलिस या आरोपींच्या शोधात होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन घोळकर, पोलिस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, एम.एम पुजारी, पोलिस अंमलदार संतोष घोगरे, दत्ता खरात, मारुती शिंदे, अमित जाधव, धीरज काकडे आदींच्या पथकाने केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी