शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

१७ दिवस सतत त्याच्याजवळ असूनही मास्क लावलेलं बाळ आईच्या स्पर्शासाठी रडायचं ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 15:16 IST

मोठे संकट टळल्याचा आनंद; कोरोनामुक्त दीड वर्षाच्या मुलाच्या आईचा ‘आयसोलेशन’मधील अनुभव

ठळक मुद्देमला कोरोना होऊ नये यासाठी देखील डॉक्टरांनी औषधे दिलीअतिशय योग्य पद्धतीने डॉक्टर, परिचारिका व सफाई कर्मचाºयांनी काळजी घेतल्याचे मुलाच्या आईने सांगत आभार मानले

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : माझ्या दीड वर्षाच्या मुलाला कोरोना झाला होता. तो लहान असल्यामुळे काही वेळा हट्ट करायचा. १७ दिवस सतत त्याच्याजवळ असूनही त्याचे हट्ट पुरविता आले नाहीत. आता तो कोरोनामुक्त झाल्याने मोठे संकट टळल्याचा आनंद झाला आहे़ अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या दीड वर्ष वय असणाºया मुलाच्या आईने अनुभव सांगितला. या दीड वर्षाच्या मुलाला आजार असला तरी त्याच्या आई-वडिलांना हा आजार नव्हता.

शेजारच्या महिलेला कोरोना झाल्यामुळे आमच्या कुटुंबीयांना केगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. तिथे तीन दिवस राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मुलाला आणण्यात आले. लहान मुलाला हा आजार झाल्याची शहरातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे डॉक्टरही लक्ष ठेवून होते. आता १४ दिवस सिव्हिलमध्ये एकाच वॉर्डात राहायचे म्हणजे भीती वाटत होती. पण मुलगा बरा व्हावा यासाठी हे करणे गरजेचे असल्याचे मुलाच्या आईने सांगितले.

अ‍ॅडमिट केल्यानंतर मुलगा बाहेर जाण्याचा हट्ट करायचा. त्यावेळी त्याला समजावून सांगण्याचे कठीण जात होते. खिडकीमधून झाड दाखविणे, तिथे होणाºया हालचाली दाखवून त्याचे मन रमविण्याचा प्रयत्न करायचे. 

गोष्टी, गाणी म्हणून दाखवायचो. रडायला लागला की पुन्हा खिडकीमध्ये घेऊन जात होतो. यादरम्यान मीदेखील १७ दिवस चेहºयाला मास्क लावला होता. मुलाच्याही चेहºयाला मास्क लावला होता. 

१७ दिवस जवळ असूनही त्याला नीट पाहता आले नाही. तोही मला चेहºयावरील मास्क काढायला सांगायचा पण काही तरी कारण सांगून मी टाळत असल्याचे मुलाच्या आईने सांगितले.

नेमका स्वॅब घेतानाच तो रडायचा- स्वॅब घेताना स्टीक रुग्णाच्या तोंडात घालावी लागते. मुल फक्त दीड वर्षाचं असल्याने त्याला या प्रक्रियेची भीती वाटत होती. स्वॅब घ्यायला लागले की तो रडायचा. दोनदा अशाच पद्धतीने स्वॅब घेण्यात आले तो त्यावेळी रडल्याने स्वॅबचा अहवाल योग्य येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला कोरोनाची लक्षणेही दिसत नव्हती. नंतर घेतलेल्या चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने त्यावर उपचार करण्यात आले. मला कोरोना होऊ नये यासाठी देखील डॉक्टरांनी औषधे दिली. अतिशय योग्य पद्धतीने डॉक्टर, परिचारिका व सफाई कर्मचाºयांनी काळजी घेतल्याचे मुलाच्या आईने सांगत आभार मानले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस