शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भातुकलीच्या खेळात रमणाºया बारा वर्षांच्या मुलीला झालं बाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:04 IST

मोहोळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार : बालदिनी जन्मलेला जीव अनाथ, जबाबदारी घ्यायला कुणीच नाही

संताजी शिंदे सोलापूर : मोहोळ तालुक्यातील एका गावात भातुकलीच्या खेळात रमणाºया १२ वर्षांच्या मुलीने प्रत्यक्षात बाळाला जन्म देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लहान मुलांनी खेळण्यात केलेल्या कृत्यातून एका जीवाचा जन्म झाला खरा; मात्र त्याची जवाबदारी घेण्यास आता कोणी तयार नाही. आई-वडील अल्पवयीन असले तरी १४ नोव्हेंबर या बाल दिनी जन्माला आलेल्या या बाळाला पुढे या जगात अनाथ म्हणून जीवन जगावे लागणार आहे. बाळाची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नसून, त्याला पाखर संकुलात दिले जाणार आहे.

गावात घराजवळच घर. दोन्ही कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची, मजुरी केल्याशिवाय पोट भरत नाही अशी अवस्था. दोन्ही कुटुंबात प्रत्येकी दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. मुलाच्या वडिलाचे निधन झाल्याने संपूर्ण संसार आईवर अवलंबून आहे. मुलगी गावातील झेडपीच्या शाळेत इयत्ता ६ वीमध्ये शिकते तर मुलगा इयत्ता ७ वीमध्ये शिकतो. शाळेतून घरी आल्यानंतर सर्व मुले  घरात भांडी-भांडीचा खेळ खेळत होते. दोघेही लहान असल्याने त्यांच्याकडे जास्त कोणाचे लक्ष जात नव्हते. वयाने लहान मात्र मोठ्या माणसाच्या संसाराचा खेळ ही मुले खेळत होती. हा खेळ खेळत खेळत दोघे आई-बाप कधी झाले हे कोणालाच कळाले नाही. 

एकेदिवशी अचानक मुलीच्या पोटात दुखू लागले. आईने एका खासगी दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टरांनी मुलगी गरोदर असल्याचे सांगितले. डॉक्टरांचे बोलणे ऐकून आईला धक्का बसला. हा प्रकार झाला कसा? याची विचारणा आईने मुलीकडे केली. मुलीने घराजवळच्याच मुलाने वेळोवेळी अत्याचार केल्याचे सांगितले. मुलीस २५ सप्टेंबर २0१८ रोजी आई-वडिलांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला अ‍ॅडमिट करून घेतले, तिच्यावर तीन महिने उपचार करण्यात आले आणि शेवटी १४ नोव्हेंबर रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. जन्माला आलेल्या बाळाच्या जन्माची नोंद झाली; मात्र त्याला कोण जन्म दिला त्या माता-पित्याची नोंद झाली नाही. मुलीच्या आई-वडिलांनी मूल स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मुलाच्या आईचीही भूमिका स्पष्ट झाली नाही; मात्र जन्माला आलेल्या नातवाला अनाथाश्रमात जावे लागणार आहे. 

आई-वडिलांचं वर्तन लहान मुलासारखंच...- अल्पवयीन मुलीने मुलास जन्म दिला, मात्र ती लहान असल्याने तिला काहीच समजत नाही. बाळ रडू लागल्यास त्याला फक्त दूध पाजण्यासाठी थोडावेळ मुलीस बोलावलं जातं, नंतर पुन्हा मुलास नवजात शिशू विभागात ठेवलं जातं. मुलीस तिच्या वॉर्डामध्ये ठेवले जाते. जन्मलेल्या बाळाला सध्या आईचं दूध मिळत असलं तरी काही दिवसानंतर त्याला गाईच्या दुधावरच मोठं व्हावं लागणार आहे. अल्पवयीन मुलगा याला आपण बाप कसा झालो हेच समजत नाही. पोलिसांच्या तपासात तो मला का आणलात, सोडा मला, मी घरी जाणार आहे असे म्हणतो आणि अगदी लहान मुलासारखं रडायला सुरुवात करतो. अल्पवयीन मुलीचे आणि मुलाचे वर्तन पाहिले तर दोघेही लहान मुलासारखेच वागतात आणि बोलतात. 

या प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे. न्यायालयात याचा अहवाल देण्यात आला असून, न्यायालयात  जो आदेश होईल त्याप्रमाणे नवजात बालकाचा निर्णय होईल. मुलीचे किंवा मुलाच्या आई-वडिलांनी मुलास स्वीकारले नाही तर शेवटी अनाथ आश्रमाशिवाय त्याला पर्याय नाही. - चंद्रकांत खांडवी, उप-विभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण पोलीस 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाRapeबलात्कार