शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बाबा का शिरखुर्मा...नानी के गुलगुले

By appasaheb.patil | Updated: May 21, 2019 13:09 IST

रमजान ईद विशेष ; नवाबी खिचडा, अफगानी खिचडा, सीताफल रबडी मागणी वाढली

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांकडून विविध खाद्यपदार्थांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे़ अशातच मागील दोन-चार वर्षांपासून ज्या खाद्यपदार्थाने रमजान महिनाच नव्हे संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक विक्रीचे विक्रम मोडले असे ‘बाबा का शिरखुर्मा़़़नानी के गुलगुले’ चे उत्पादन यंदाच्या वर्षी विजापूर वेस परिसरात मोठ्या प्रमाणात विक्रीला जात असल्याची माहिती मुश्ताक बच्चेभाई यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितली.

रमजान ईदच्या निमित्ताने विजापूर वेसमधील बाजारपेठेत मुस्लीम बांधवांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे़ रमजाननिमित्ताने विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बाजारात विक्रीसाठी आले आहेत़ सहेरी व इफ्तार या खास कार्यक्रमासाठी मुस्लीम बांधवांबरोबरच सामाजिक संस्था, संघटनांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

मुस्लीम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याला ७ मे पासून सुरुवात झाली. या महिन्यात उष:कालापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक उपवास पाळले जातात. या महिन्यामध्ये रोजे असल्याने सुका मेवा, मिठाई, फळे, खजूर यांची मागणी वाढली असून शहरातील विजापूर वेस, बेगम पेठ, नई जिंदगी, शास्त्री नगर, मंगळवार पेठ, बाराईमाम चौक, ७० फूट रोड, आसरा चौक या भागांमधील विविध खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत. दररोज सायंकाळी या दुकानांवर खरेदीसाठी गर्दी होत आहे़ विजापूर वेस परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने या भागात दररोज सेलिब्रेशनचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

खजुराचे यंदाही आकर्षण वेगळेच...- रमजान महिन्यात खाद्यपदार्थात मुख्यत: वेगवेगळ्या प्रकारचे खजूर सर्वांचे आकर्षण ठरत आहेत़ यंदाही बाजारपेठेत  ट्रे खजूर, डाली खजूर, अंगुरी, इराणी, बदाम, रोतब, सौदी अरेबिया, रसगुल्ला खजूर, केमिया, कॅडबरी, टोनीसीया, मेवावाला, खनिजी, इराक अशा विविध प्रकारांच्या खजुरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे़ उपवास सोडण्यासाठी मुस्लीम बांधव प्रामुख्याने खजुराचे सेवन करतात़  गुणवत्ता व आकारानुसार खजुराचे भाव ठरवले असून सर्व प्रकारच्या खजुरांना चांगली मागणी आहे.

नवाबी, अफगानी खिचडाला परराज्यातही मागणी - रमजान महिन्यात मुस्लीम बांधवासोबतच हिंदू समाजात असलेल्या विविध जातीधर्मातील लोकांकडून विविध खाद्यपदार्थांची खरेदी होत आहे़ अशातच नवाबी खिचडा व अफगानी खिचडाची क्रेझ यंदा सर्वाधिक आहे़ ६०० ग्रॅमचे पाकीट साधारणपणे ७० ते ८० रुपयास मिळत आहे़ सोलापुरात तयार होणाºया खिचडाला आंधप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात आदी राज्यात मागणी जास्त आहे़ 

मुस्लीम बांधवांसाठी सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू असल्याने बाजारपेठेत खिचडा, मिल्क शेक, खीर, मिठाई, सुका मेवा, फळे, खजूर यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विविध पदार्थांच्या किंमती स्थिर असल्यामुळे मुस्लीम बांधवांचा खरेदीचा हा उत्साह रमजान ईदपर्यंत कायम राहील़ - मुश्ताक बच्चेभाई,विजापूर वेस

 

टॅग्स :SolapurसोलापूरRamzan Eidरमजान ईदRamzanरमजानMarketबाजार