शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकीची ठेवूनी जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

गुरुजी राबवताहेत तणाव मुक्ती अभियान संदीप लोणकर श्रीपूर : कोविडच्या काळात सर्वत्र श्रद्धांजलीच्या पोस्ट, फोटो, नकारात्मक बातम्या या बाबी ...

गुरुजी राबवताहेत तणाव मुक्ती अभियान

संदीप लोणकर

श्रीपूर : कोविडच्या काळात सर्वत्र श्रद्धांजलीच्या पोस्ट, फोटो, नकारात्मक बातम्या या बाबी गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती, दहशत, मानसिक ताण निर्माण करण्यास कारणीभूत ठरत होत्या. अशावेळी पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे नातेवाईक, सर्व गावकऱ्यांना या ताणतणावातून बाहेर काढून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी कैलास गायकवाड सर सरसावले आहेत.

मूळ चाकोरे गावचे रहिवासी असलेले व सध्या अकलूज येथे कार्यरत असलेले कैलास गायकवाड गुरुजींनी ही कल्पना मांडली. इतर शिक्षकांनी लगेच सहमती देत या उपक्रमांमुळे गावातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होत आहे. चाकोरे (तालुका माळशिरस) हे गाव सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या पंधरा ते सतरा व्यक्ती पॉझिटिव्ह असून, ते घरी विलगीकरणात आहेत. सहा ते आठ जण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उजाडणारा दिवस कोणती बातमी घेऊन येतोय याचीच भीती प्रत्येकाच्या मनात दिसायला लागली होती.

या ग्रुपमध्ये बाळासाहेब शिंदे, गुरुनाथ स्वामी, एकनाथ कदम, दत्तात्रय टकले, हरी खरात, अर्जुन ननवरे, तात्याराम कुंभार,बाळासाहेब कुंभार, अमर गायकवाड, नाना वरकड, सचिन भोसले, विजय शिंदे, अजिनाथ शिंदे, विष्णू शिंदे, अभिजित बनकर,अनिल शिंदे, देविदास वरकड, ज्योतीराम भोसले, संतोष ढवळे हे सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी कार्य करीत आहेत.

आणि नकारात्मक पोस्ट बंद केल्या

गावात गावकऱ्यांचे दोन व्हॉट्‌सॲप ग्रुप आहेत. सरपंच अर्चना शिंदे व जि. प. सदस्या मंगल वाघमोडे यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या दोन्ही व्हॉट्‌सॲप ग्रुपचे सेटिंग बदलून ओन्ली ॲडमिन कॅन सेन्ड मेसेजेस असे करण्यात आले. त्यामुळे या ग्रुपवर येणाऱ्या श्रद्धांजलीच्या व नकारात्मक पोस्ट बंद झाल्या.

--

असे केले जाते समुपदेशन

सध्या चाकोरेकर शिक्षक ग्रुपमध्ये वातावरण तणावमुक्त करण्यासाठी चर्चा केली जाते. यापूर्वी पॉझिटिव्ह आलेले पण सध्या कोरोना मुक्त झालेले शिक्षक आत्माराम गायकवाड गुरुजी मनोरंजक व्हिडिओ बनवून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह.भ.प. तुकाराम वाघमोडे गुरुजी आपल्या सुश्राव्य वाणीतून ऑडिओ बनवून सकारात्मक विचारांची पेरणी करत आहेत. मच्छिंद्र ननवरे गुरुजी स्वतः जोखीम घेऊन ॲडमिट पेशंटच्या भेटी घेऊन पेशंटमध्ये बरे होण्याची उमेद निर्माण करत आहेत.

----

क्वारंटाईन सेंटर तयार करणार

मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडली अशी ओरड सगळीकडे असताना या शिक्षकांनी मोबाईलचा सदुपयोग करून गावात सकारात्मक वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालवला आहे. ॲड. चंद्रकांत शिंदे व माजी सरपंच किरणआप्पा वाघमोडे आणि गावकरी शिक्षक गावातच क्वारंटाईन सेंटर तयार करण्याच्या विचारात आहेत.गावामध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने गावातच लसीकरण सुविधा निर्माण करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे व पाठपुरावा चालू आहे.

----