शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

संवेदना ठेवल्या जागृत; निराधार चिमुकल्यांना 'त्यांनी' दिला शैक्षणिक आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 08:51 IST

पॉझिटिव्ह स्टोरी; जिल्हा व मंगळवेढा तालुका पोलीस पाटील संघटनेने दिला मदतीचा हात

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे संसार उध्दवस्त झाले घरातील कर्ती व कुटुंबप्रमुख मंडळी मृत्यू पावली.यात अनेकजन निराधार झाली तर अनेकांची जीवनवाट बिकट करून ठेवली.  मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथील गावचे पोलीस पाटील असणारे हणमंत कांबळे यांच्या  निधनाने कांबळे कुटुंबाला मोठा आघात झाला. त्यांच्या  निधनाने  पोरक्या झालेल्या कुटुंबियाला  दु:खावर मात करण्याचे बळ यावे मुलांना शैक्षणिक आधार मिळावा म्हणून सोलपुर जिल्हा व मंगळवेढा तालुका पोलीस पाटील संघटनेकडून त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेऊन  मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी ६० हजार ५०० रुपयांची आर्थिक  मदत  घरी जाऊन देऊन  सामाजिक संवेदना जागृत ठेवल्या आहेत.

गरीब परिस्थितीतुन कुटुंबाची गुजराण करणारे व कामात कर्तव्यदक्ष असणारे हणमंत कांबळे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने  पश्चात दोन मुले, एक मुलीचे   शैक्षणिक भविष्य अंधारमय झाले.आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रा शशांक गवळी यांनी पुढाकार घेतला सर्वांनी मिळून निधी एकत्र करून कुटुंबियाच्या हाती सुपूर्त केला.

भविष्यात कोणत्याही गोष्टीची अडचण आली  तरी सम्पर्क करा. काहीही कमी पडू देणार नाही असा आश्वासक दिलासाही दिला. यावेळी चिमकुल्याच्या चेहऱ्यावर फुटलेले सिमतहास्य व पत्नीचा खुललेला चेहरा उपस्थिताचे मन हेलावुन गेला.

यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रा.शशांक गवळी, जालीहाळचे तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष ईश्वर यजगर , उपाध्यक्ष आनंद रायबान , महेश पवार, शिवकुमार पाटील, सावकर भुसे, दत्तात्रय पाटील, जवीर पाटील, पद्माकर बनसोडे, दादासाहेब थोरबोले, जोती कांबळे, संजय गरंडे, प्रशांत पाटील उपस्थीत होते..........................................कुटुंबकर्ता गेल्याने त्यामागील कुटुंबाचे खूप हाल होतात . आमचा एक सहकारी कोरोनाने हिरावल्याने त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबासाठी आमच्या संघटनेतील सर्व सदस्यांनी ६० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत देऊन सामाजिक भान जपले भविष्यातही त्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही---प्रा  शशांक गवळी तालुकाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना मंगळवेढा

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या