शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन सशुल्क करणार : अतुल भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 16:11 IST

पंढरपूर : राज्यभरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी एकमताने श्री विठ्ठलाच्या सशुल्क दर्शनाचा ठराव करून दिल्यास एक दिवसात सशुल्क दर्शनाची आपण अंमलबजावणी करू, असे आश्वासन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिले. राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर डॉ. अतुल भोसले हे बुधवारी प्रथमच पंढरपुरात आले होते. श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी ...

ठळक मुद्देकेंद्र सरकार विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देणार - अतुल भोसलेजूनअखेर श्री विठ्ठलाची टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार - अतुल भोसलेश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्वच कामांचा दर्जा चांगला

पंढरपूर : राज्यभरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी एकमताने श्री विठ्ठलाच्या सशुल्क दर्शनाचा ठराव करून दिल्यास एक दिवसात सशुल्क दर्शनाची आपण अंमलबजावणी करू, असे आश्वासन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिले. 

राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर डॉ. अतुल भोसले हे बुधवारी प्रथमच पंढरपुरात आले होते. श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

डॉ. अतुल भोसले म्हणाले, सर्वात जास्त भाविकांची गर्दी असलेल्या देशातील पहिल्या १५ मंदिरांमध्ये राज्यातील शिर्डी आणि पंढरपूर या देवस्थानांचा समावेश झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकार विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे. टोकन दर्शन सुविधा हा त्याचाच एक भाग आहे. अधिक महिना संपल्यानंतर म्हणजेच जूनअखेर श्री विठ्ठलाची टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार असून ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर असेल़ टोकन दर्शन व्यवस्थेसाठी शहरात विविध ४० ठिकाणी आपण टोकन सुविधेचे काऊंटर सरू करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्वच कामांचा दर्जा चांगला रहावा, यासाठी आपण समिती गठित करणार आहे़ यामध्ये स्वच्छता समिती, लाडू प्रसाद समिती आणि भक्तनिवास समितीचा समावेश असणार आहे. शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा या समित्यांमध्ये समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

खास बाब म्हणून मंत्रिपद - पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची कामे शासनस्तरावर जलदगतीने मार्गी लागावीत, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊ केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाची आपणावर जबाबदारी देऊन त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊ केलेला आहे़ याचा उपयोग निश्चितच भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यासाठी करू, असे आश्वासन डॉ़ अतुल भोसले यांनी दिले़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर