शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

माध्यमांनी जनतेच्या खºया प्रश्नांकडे लक्ष द्यावे, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांचे मत, सोलापूर विद्यापीठात झाले व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:40 IST

सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या खºया प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात ‘समाजाचे प्रश्न आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.आजचे युग हे वेगवान युग आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये : पद्मभूषण देशपांडेबदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली : पद्मभूषण देशपांडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या खºया प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात ‘समाजाचे प्रश्न आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मंचावर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ, दत्ता गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. इ. एन. अशोककुमार होते. पुढे बोलताना देशपांडे म्हणाले की, आजचे युग हे वेगवान युग आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये. बदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली आहे. यापुढच्या काळात टेलिव्हिजनचे युग संपून मोबाईलचे युग व्यापक होईल, त्यादृष्टीने भावी पत्रकारांनी तंत्रज्ञान कौशल्य मिळवायला हवे. दत्ता बाळसराफ म्हणाले की, एकेकाळी संगणक अनेकांना बेरोजगार करील या भीतीतून समाजाच्या सर्वच स्तरातून नवतंत्रज्ञानाला विरोध झाला. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले व संगणकाचा देशात प्रसार होण्यास उशीर झाला. यापुढे नवतंत्रज्ञानाला विरोध केला जाऊ नये. सजगपणे नवतंत्रज्ञान स्वीकारावे. कालबाह्य झालेले अभ्यासक्रम, पध्दती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. दत्ता गायकवाड म्हणाले की, जुने ते सर्व वाईट असे मानणे चूक ठरेल. तत्त्वज्ञानासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची आजही तेवढीच गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले. सदर कार्यक्रमास नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक नीलेश राऊत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, विजय काणेकर, डॉ. माया पाटील, प्रा. अंबादास भासके, प्रा. मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.-----------------जनतेला योग्य मार्गदर्शन करा : अशोककुमार- आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. याचे फायदे अनेक असले तरी तोटेही नाकारता येत नाहीत. माध्यमांमध्ये बदल होत आहे ही चांगली बाब असली तरी त्यांनी जनतेला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, तरच त्याचा चांगला हेतू साध्य होईल, असे मत यावेळी डॉ. इ. एन. अशोककुमार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलाताना व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर