शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिकेतील एलबीटीचा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:14 IST

सोलापूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी) च्या वसुलीत झालेला घोटाळा दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत संस्थांच्या कागदपत्रांची माहिती मागूनही ...

ठळक मुद्देशिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांचा आरोप तडजोडीची प्रकरणे आर्थिक हितसंबंधाने मिटविलीतत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घोटाळा झाल्याची कबुली देत चौकशी समिती नेमली

सोलापूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी) च्या वसुलीत झालेला घोटाळा दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत संस्थांच्या कागदपत्रांची माहिती मागूनही दिली जात नाही, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी केला. 

हंचाटे म्हणाले, महापालिकेत अधिकाºयांनी शहरातील एलबीटी वसुलीची चार ते पाच कोटी रुपयांची प्रकरणे परस्पर मिटविली आहेत. एका वाईन दुकानाच्या एलबीटी वसुलीत घोटाळा झाल्याच्या तक्रारी आल्या. याबाबत आम्ही महापालिकेच्या सभेत आवाज उठविला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घोटाळा झाल्याची कबुली देत चौकशी समिती नेमली होती.

या चौकशी समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. या घोटाळ्यात महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. त्यांनी या घोटाळ्यातून जमलेली माया स्पष्टपणे दिसत आहे. पण आता चौकशी अहवाल दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. एलबीटी विभागातील अधिकारी ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात शिवसेनेचे नगरसेवक आगामी सर्वसाधारण सभेत आवाज उठवतील, असा इशाराही हंचाटे यांनी दिला. 

तडजोडीची प्रकरणे आर्थिक हितसंबंधाने मिटविली- हंचाटे म्हणाले, एलबीटीचे अद्याप चार ते पाच कोटी रुपयांचे येणे आहे. शहरातील ४५०० व्यावसायिकांच्या प्रकरणात वसुलीचा आकडा निश्चित करण्यात आला. त्यावर हरकती सुनावणी घेण्यात आल्या. अद्याप २०० फायलींवर निर्णय झालेला नाही. या २०० फायली का दडपून ठेवल्या जात आहेत. एक तर ही प्रकरणे निकाली काढा किंवा थकीत एलबीटी वसूल करा. काही प्रकरणात सीएला हाताशी धरुन दंडाची रक्कम वाढविण्यात आली. ही रक्कम कमी करावी म्हणून अधिकाºयांनी पैसे उकळले. त्याचे पुरावे जमा केले जात आहेत़ सभागृहात ही माहिती दिली जाईल, असेही हंचाटे यांनी सांगितले. 

बड्या थकबाकीदारांचा निर्णय कधी घेणार- शहरातील एक ज्वेलर्स, चार अ‍ॅटोमोबाईल्सधारक यांच्याकडील वसुली थकीत आहे. त्यांच्याकडील वसुली कधी करणार असे विचारल्यानंतर एलबीटी विभागातील अधिकारी वरिष्ठ अधिकाºयांकडे बोट दाखवत आहेत. एक रुग्णालय आणि एका साखर कारखान्याकडील मूल्यांकन तयार झालेले नाही. हे सर्व ठरवून केले जात आहे, असेही हंचाटे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTaxकर