शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 10:48 IST

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश; पीडित मुलीस २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

ठळक मुद्देशिवानंद मल्लप्पा कोळी (वय १९, रा. सोलापूर) असे कारावास सुनावलेल्या आरोपीचे नावजिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीपीडित मुलीस २५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचे आदेश दिले

सोलापूर : शाळा सुटल्यानंतर बालमैत्रिणींबरोबर खेळत असताना त्यांना हुसकावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तर पीडित मुलीस २५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचे आदेश दिले. 

शिवानंद मल्लप्पा कोळी (वय १९, रा. सोलापूर) असे कारावास सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. एकेदिवशी अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत मंदिरात खेळत होती. शिवानंद कोळी हा तिथे आला, त्याने अन्य मुलींना तेथून हुसकावून लावले अन् पीडित मुलीला मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेले. तेथे तुझा गळा दाबतो, तुला मारून टाकतो, अशी भीती घालून तिच्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. शिवानंद कोळी याच्या भीतीने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र, ती त्रास होत असल्याचे सांगत होती, तेव्हा घरच्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. मुलीने घडलेला सर्व प्रकार आई व आजीला सांगितला. यावर आई व आजीने आरोपीच्या आईला हा प्रकार सांगितला असता तिनेही कोणाला सांगू नका, असे सांगितले. 

पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक बी. एच. पाटील व तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त सुभाष नेवे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून ११ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणी पीडित बालिका, तिची आई, आजी, डॉक्टर व तपास अधिकाºयांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. गंगाधर रामपुरे तर आरोपीतर्फे अ‍ॅड. मनोज गिरी यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस नाईक अनुराधा गुत्तीकोंडा यांनी काम पाहिले. 

फुलण्याआधीच मुलीचे जीवन झाले अंधकारमय : सरकारी वकिलांचा युक्तिवाद- सुनावणीदरम्यान युक्तिवाद करताना सरकारी वकील अ‍ॅड. गंगाधर रामपुरे म्हणाले की, आरोपीने पवित्र मंदिर आवारात केवळ ८ वर्षांच्या व नुकत्याच शाळेत पाऊल ठेवलेल्या चिमुकलीवर अत्याचार केला. या प्रकारामुळे एका कोवळ्या मुलीच्या जीवनात फुलण्याआधीच अंधार झाला आहे. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अ‍ॅड. रामपुरे यांनी केला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. पीडित मुलीस २५ हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसadvocateवकिलCrime Newsगुन्हेगारी