बार्शी : बार्शी येथील माजी नगरसेवक व सेवानिवृत्त प्राध्यापकास अनोळखी इसमाने मोबाईलवरुन बँक खात्याची माहिती विचारुन परस्पर ६१ हजार ८८० रुपये काढून फसवणूक केली. सोमवारी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
याबाबत सुनील जावळी यांनी ३१ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा शहर पोलिसात तक्रार दिली. या दिवशी अज्ञाताने मोबाईलवरून बोलत असल्याचे सांगून मोबाईल, इमेल आयडी, नाव, बँक अकाउंटवर असलेल्या बँकेचे अकाउंट नंबर, अशी सर्व माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्या इसमाने फिर्यादीच्या परस्पर मोबाईल नंबरवरून रात्रीत सुभाषनगर एस.बी.आय.बँक शाखेतून दोनवेळा दहा-दहा हजार तर त्याच रात्री १२ वाजता ५० हजार ८८० रुपये असे ६१ हजार ८८० रुपये काढून घेतले. त्यानंतर सुभाष बँकेचा मेसेज आल्याने दुसऱ्या दिवशी फिर्यादीने बँकेत जाऊन चौकशी केली. बँक खात्यातून वरील रक्कम काढल्याने त्यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल दिली. तपास पोलीस निरीक्षक रामराव शेळके करत आहेत.
---