शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आषाढी वारी विशेष ; पंढरपुरातल्या मूर्ती सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:20 IST

नावीन्यपूर्ण बाजारपेठ : दगडी मूर्तीला भाविकांतून मोठ्या प्रमाणात मागणी

ठळक मुद्दे१२ महिने २४ तास हे शहर भाविकांनी गजबजलेले असतेसाहजिकच येथील बाजारपेठही नावीन्यपूर्ण आहेहाताने घडवलेल्या दगडी मूर्तीला भाविकांतून मोठ्या प्रमाणात मागणी

अंबादास वायदंडे पंढरपूर : ‘चंद्रभागा तीरी, उभा विटेवरी... कर कटेवरी उभा विटेवरी’ असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी देशासह परदेशातूनही भाविक येतात़ त्यामुळे येथील विविध देवतांच्या मूर्ती परदेशात गेल्याचे मूर्तीकारांनी सांगितले़.

आध्यात्मिकाची काशी मानली जाणाºया पांडुरंगाच्या पंढरी नगरीत आषाढी यात्रेस विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशाच्या कानाकोपºयातून लाखो भाविक येतात. १२ महिने २४ तास हे शहर भाविकांनी गजबजलेले असते. साहजिकच येथील बाजारपेठही नावीन्यपूर्ण आहे. हाताने घडवलेल्या दगडी मूर्तीला भाविकांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे़

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची रोजच्या रोज पूजा, आरती करण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातील भाविकसुद्धा पंढरपुरात आल्यानंतर मूर्ती घेऊन जातात़ गावोगावी मूर्तीची प्रतिष्ठापना करून नित्यनियमाने पूजा करतात़पंढरपुरात दगडापासून मूर्ती घडविण्याचे दहा कारखाने आहेत. या मूर्तीच्या व्यवसायावर २५० ते ३०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो़ आषाढी यात्रेत दहा लाख रुपयांच्या आसपास मूर्तींची विक्री होते. काळापाषाण, शाळीग्राम पाषाण, मटकना मार्बल, काळा मार्बल व खाणीतील दगडापासून ही मूर्ती तयार केली जाते़ हे दगड कर्नाटक, राजस्थान व ग्रामीण भागातून मागवले जातात. पंढरपुरात संजय मंडवाले यांचे कोणार्क शिल्प हे मूर्तीचे दुकान आहे.

आमचा हा पारंपरिक व्यवसाय असून या कारखान्यातून सर्व देवदेवतांच्या, संत, महाराज मंडळींच्या मूर्ती व महामानवाचे पुतळे दगडापासून हाताने घडवून तयार केले जातात. आमच्याकडील मूर्ती पाकिस्तानात गोरक्षनाथाची, अटलांटिकमध्ये गजानन महाराजांची, पश्चिम जर्मनीत श्री कृष्णाची, अमेरिकेत तुळजाभवानीची व चेन्नईमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती विकली गेली आहे़ मूर्तीची किंमत त्याच्या आकारावरून ठरविली जाते़ 

आता आषाढी यात्रेसाठी आमच्याकडे लहान-मोठ्या २५० मूर्ती तयार आहेत. सर्वाधिक पसंती ही विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला आहे़ दगडाला वेगवेगळा आकार देऊन पॉलिश रंग देऊन आकर्षक मूर्ती तयार केली जाते़

शासनाने दहा फुटाच्या खाली जमिनीचे उत्खनन करू नये, असा नियम काढल्याने मूर्ती तयार करण्यासाठी लागणाºया दगडाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुढील काळात मूर्तीचे दगड न मिळाल्यास हा व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. या व्यवसायावर अनेक कारागिरांचा संसार चालतो़ शहरातील अनेक कारखाने बंद पडल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे़- राजेंद्रसिंह मंडवाले, मूर्तीकार, पंढरपूर.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा