शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी विशेष ; तुकोबारायांच्या पालखीतही माऊलींच्या पादुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:13 IST

शेकडो वर्षांची परंपरा : तुकोबारायांच्या पुत्राने केली पालखी सोहळ्याची सुरुवात

ठळक मुद्देरथाच्या पुढे चालते मानाची पाथरुडकर दिंडीतुकोबांच्या पालखीत माऊलींच्या मूळ तांब्याच्या पादुकादेहूकरांकडून आजही दोन्ही पादुका एकत्र नेण्याची पं्रथा सुरू

शहाजी फुरडे-पाटील

संत तुकाराम पालखी मार्ग : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी देहू येथून पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पहाटे काकडा, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी स्थानिक मानकरी यांच्या महापूजा, दोन्ही वेळेचे नैवेद्य, शेजारती असे नित्योपचार पार पडतात. विशेष म्हणजे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पालखीमध्ये केवळ संत तुकोबारायांच्याच नव्हे तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुकांचे दर्शन घडते. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे. पालखी सोहळ्याची सुरुवात ही संत तुकाराम महाराजांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केली. नारायण महाराज यांना संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अवतार मानले जाते. 

तुकोबांचे सेवाऋण फेडायासाठी। अवतरला ज्ञानोबा जिजाई पोटी।। यासाठी अभंगाचे हे प्रमाण देखील आहे.देहूपासून सुरू झालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढे देहू व आळंदी असा एकत्र चालायचा. त्यामध्ये दोन्ही संतांच्या पादुका असायच्या. पुढे कालांतराने हे दोन्ही सोहळे विभक्त झाले. मात्र देहूकरांकडून आजही दोन्ही पादुका एकत्र नेण्याची पं्रथा सुरू आहे.

तुकोबांच्या पालखीत माऊलींच्या मूळ तांब्याच्या पादुका आहेत तर तुकोबांच्या पादुका या चांदीच्या आहेत. माऊलींच्या पादुका आतील बाजूस तर बाहेरच्या बाजूला तुकोबांच्या पादुका आहेत. वारीच्या या वाटचालीत रात्री शेजारतीला दोन्ही पादुका सिंहासनावर ठेवून काढा वगैरे उपचार देऊन पूजा केली जाते. त्यानंतर गोड दूध, शेंगदाणे यांचा प्रसाद दिला जातो. शेजारती सुरू असताना अभंग गात तुकाराम तुकाराम, असा जयघोष अखंडपणे सुरू असतो. या शेजारतीला स्थानिक ग्रामस्थांची मोठी उपस्थिती असते.

पहाटेचा काकडा झाल्याशिवाय तुकोबा झोपेतून उठत नाहीत आणि शेजारती झाल्याशिवाय ते झोपत नाहीत. आणि शेजारती झाल्याशिवाय पहाटे काकडा होत नाही. वारीच्या या मार्गक्रमणात सर्व नियोजन हे चोपदार करतात. तर काकडा आरतीचा मान हा देहू संस्थानचे माजी विश्वस्त विश्वजित मोरे महाराज यांच्याकडे परंपरेने चालत आला आहे. प्रस्थानाचा आणि दुपारचा तुकोबांचा नैवेद्य हा रथाच्या पुढे चालण्याचा मान असलेल्या पाथरुडकर दिंडीकडे असतो. शेजारतीचे सर्व धार्मिक विधी व आरती आदी जबाबदारी ह. भ. प. पुंडलिक मोरे महाराज हे पार पाडतात.

रथाच्या पुढे चालते मानाची पाथरुडकर दिंडीपाथरुडकर दिंडी ही रथाच्या पुढे चालते. रथाच्या पुढे चालणे हे अवघड काम असते. कारण जलदगतीने चालावे लागते; मात्र ही दिंडी गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आहे. म्हातारबुवा पाथरुडकर यांनी या दिंडीची स्थापना केली आहे. पाथरुड, तालुका माजलगाव या परिसरातील वारकरी या दिंडीत चालतात. विशेष म्हणजे या दिंडीतील वारकरी हे माजलगाववरून पंढरपूर-आळंदी-देहू व त्यानंतर पुढे देहू ते पंढरपूर असा सुमारे पाचशेपेक्षा जास्त किलोमीटर अंतर पायी चालत येतात. दिंडीत सुमारे ३५० वारकरी आहेत. भगवान बाबा पाथरुडकर हे दिंडीचालक म्हणून काम पाहत आहेत.

पाथरुडकर दिंडीतील वीणेकरी ९७ वर्षांचेया मानाच्या पाथरुडकर दिंडीत दोन वीणेकरी आहेत. यातील लक्ष्मण दाजीबा शेरकर हे मोगरा, तालुका माजलगाव येथील रहिवासी. त्यांचे आज वय आहे ९७ वर्षे आणि त्यांची वारी आहे ५२ वी. एवढ्या वयातही ते आणि त्यांचे १० ते १२ सहकारी पंढरपूर, देहू व नंतर माजलगाव असे अंतर दोन महिने पायी चालून पूर्ण करतात. वारीत एवढी वर्षे चालता आली, त्याबद्दल ते खूप आनंदी आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर