शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आषाढी वारी विशेष ; वाहतुकीसाठी ९७३ पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:19 IST

पंढरपूरच्या चारही बाजूने पार्किंगची सोय

ठळक मुद्देएसटी बससाठी भीमा बसस्थानक तयार यात्रा कालावधीत संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद१४ ते २८ जुलैदरम्यान पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी

सचिन कांबळे पंढरपूर : आषाढी यात्रेत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष तयारी केली असून या कामासाठी ९७३ जणांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आषाढी यात्रेसाठी रेल्वे, एस. टी. बस व खासगी वाहनाने लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. शिवाय हजारो वाहने शहरात येतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचा आराखडा तयार केला आहे. वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे, यासाठी वाहतूक शाखा कामाला लागलेली असते.

१४ ते २८ जुलैदरम्यान पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक करणे, गर्दीच्या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. त्याचबरोबर एस. टी. साठीही नवीन बसस्थानके तयार केली आहेत.

वाहतुकीवर नियंत्रण असावे यासाठी १ अपर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, ४० सहायक पोलीस निरीक्षक, ४०० गामा कमांडो, ३२० वाहतूक पोलीस कर्मचारी, १०० पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड यांचा बंदोबस्त लावला असल्याची माहिती सपोनि सारंग चव्हाण यांनी दिली़ याकामी त्यांना पोना दौलतराव तलावार, पोना जनार्धन गरंडे, प्रवीणकुमार सोनवले, मेहबूब इनामदार, पोकॉ जावेद तांबोळी यांचे सहकार्य मिळत आहे.

शहरातून बाहेर जाणाचा मार्ग- टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणाºया सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, कौठाळी बायपास, नवीन सोलापूर नाका, करकंबमार्गे जातील. पुणे, साताराकडे जाणाºया सर्व गाड्या सावरकर चौक ते नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड वाखरीमार्गे इच्छित स्थळी जातील. विजयपूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढामार्गे जाणाºया सर्व गाड्या सावरकर चौक ते गादेगाव फाट्यापासून संबंधित मार्गाने इच्छित स्थळी जातील.

   या ठिकाणी प्रवेश बंद- यात्रा कालावधीत संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल़ महाद्वार चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्वप्रकारच्या वाहनांसाठी व वाहतुकीसाठी प्रवेश बंद आहे. सावरकर चौक ते शिवाजी चौक या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांना बंद असेल़ नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाºया एस. टी. बस यांना जुना दगडी पूल ते तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने शहरात सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बॅँक, सावरकर चौक ते भक्तिमार्ग ते काळामारुती चौक या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे. लहूजी वस्ताद चौक ते काळा मारुती चौक या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे.

बाहेरून येणाºया वाहनांचे पार्किंग- नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, अहिल्यादेवी चौक शेटफळ चौकमार्गे विसावा येथे पार्क करतील. तसेच ६५ एकर येथे फक्त दिंडी व पालखीची वाहने पार्क केली जातील़ पुणे,               सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने इसबावी विसावा, गाताडे प्लॉट व कॉलेज क्रॉस रोड, कॉलेज चौकीच्या पाठीमागील मैदानात पार्क करतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करतील.

कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोलामार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी बायपासमार्गे वेअर हाऊस येथे पार्क करतील किंवा टाकळीमार्गे येऊन टाकळी हायस्कूल मैदान येथे पार्क करतील. विजापूर,  मंगळवेढ्याकडून येणारी वाहने ही कासेगाव, कासेगाव फाटा, टाकळीमार्गे येऊन वेअर हाऊस येथे पार्क करतील. तसेच यमाई-तुकाई मंदिर मैदान येथे पार्क करतील. बार्शी, सोलापूर या मार्गावरुन तीन रस्ता येणारी वाहने अहिल्यादेवी चौक नवीन पुलामार्गे तीन रस्ता येथील नगरपालिका वाहनतळावर उतरतील.

एस. टी. चे पार्किंग व नवीन बसस्थानके- विदर्भ, मराठवाडा, सोलापूर विभागातील यात्रेसाठी येणाºया एसटी बससाठी भीमा बसस्थानक तयार आहे. नगर विभाग, नाशिक विभाग व जळगाव विभागाकडून येणाºया बस या विठ्ठल अलायटिंग पॉर्इंट (अहिल्या चौकजवळ) येथे भाविकांना सोडतील व विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे येथे पार्क होतील़ मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व कोकण विभागाकडून येणाºया एस. टी. बस या कासेगाव फाटा, टाकळी बायपास, गादेगाव फाटा, गादेगाव, सातारा नाला, बाजीराव विहीर, कौठाळी बायपास फाटा, जुन्या अकलूज रोडने चंद्रभागा बसस्थानक या ठिकाणी येतील तसेच वरील मार्गे भाविकांना घेऊन परत जातील. या बस चंद्रभागा बसस्थानक याठिकाणी पार्क होतील.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर