शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

आषाढी वारी सोहळा ; दर्शन रांगेत उभारतील दीड लाख भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:15 IST

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची माहिती, भाविकांसाठी ३ किमीचे मॅट; १५ लाख लिटर शुद्ध पाण्याची सोय

ठळक मुद्देदर्शन रांगेत असणार २० एलसीडी टीव्हीमंदिर समितीने भाविकांना रांगेत अधिक सुविधा देण्याचा केला निर्धार मंदिर समितीने तात्पुरत्या शेडची संख्या वाढवली

प्रभू पुजारीपंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने स्कायवॉकनंतर पत्राशेड आणि पुढे बांबू उभारून दर्शन रांगेत एकाचवेळी सुमारे दीड लाख भाविक उभा राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ शिवाय या भाविकांना १५ लाख लिटर शुद्ध पाणी देण्याचे नियोजन केले आहे. पाऊस, चिखल यापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून वॉटरप्रूफ शेड्स, शेडमध्ये २८ हजार चौरस फुटाचे म्हणजेच सुमारे ३ किलोमीटर अंतरावर मॅट अंथरले आहे. त्यामुळे भाविकांनी शिस्तीत विठ्ठल दर्शन घेऊन यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी केले़ 

आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात़ चंद्रभागेत पवित्र स्नान झाल्यानंतर भाविक पदस्पर्श दर्शनासाठी दर्शन रांगेत सहभागी होतात; मात्र ही रांग पत्राशेड, तात्पुरते शेड उभारल्याच्या पुढे गोपाळपूर आणि विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत जाते़ तेथून भाविक दर्शन रांगेत सहभागी होतात़ या भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभरीत्या व्हावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यंदा प्रथमच वॉटरप्रूफ शेडबरोबरच चिखल होऊ नये म्हणून ३ किमी अंतरावर रांगेत मॅट टाकले आहे. तसेच भाविकांना पिण्यासाठी १५ लाख लिटर आर. ओ. च्या पाण्याची सोय केली आहे. शिवाय अखंडपणे उभारून कंटाळा येतो म्हणून ठिकठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे़ त्यामुळे यंदा वारकºयांना दर्शन रांगेत फारसा त्रास होणार नसल्याचे दिसून येते.

आषाढी वारी सर्वात मोठी असल्याने भाविकांची संख्या १५ लाखांवर जाते. यातील सुमारे ६० टक्के भाविक रांगेत उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घेतात; मात्र पाऊस, चिखल, ५ ते ६ किलोमीटरच्या रांगेत दिवसरात्र उभा राहणे, यामुळे भाविकांना खूप त्रास सहन करावा लागतो. सावळ्या विठ्ठलाच्या १ सेकंदभर दर्शनासाठी तो हा त्रास आनंदाने सहन करतो़ 

यंदा मात्र मंदिर समितीने भाविकांना रांगेत अधिक सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, ४ कायमस्वरूपी पत्राशेड आहेत़  याशिवाय यात्रेसाठी मंदिर समिती दरवर्षी तात्पुरते शेड्स उभा करीत असते. या शेडमध्ये पाऊस आला की चिखल होतो आणि भाविकांना पाऊस, चिखलाचा त्रास होतो. यंदा मंदिर समितीने तात्पुरत्या शेडची संख्या वाढवली असून ६ शेड उभारले आहेत. त्यावर पत्रे टाकून हे शेड वॉटरप्रूफ केले आहेत. आता दर्शन रांगेत एकूण १० शेड झाले आहेत. तर पुढे श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढे दर्शन रांग उभी केली आहे. 

मंदिर समितीकडून प्रथमच सुविधाया रांगेत चिखल होऊ नये म्हणून यंदा  मंदिर समितीच्या वतीने प्लास्टिकचे मॅट खरेदी केले असून सुमारे ३ किलोमीटर लांबीचे हे मॅट तात्पुरत्या शेडमध्ये टाकण्यात आले आहेत. या मॅटमुळे रांगेत चिखल होणार नाही तसेच भाविकांच्या पायाला मुरुम, कृश खडी टोचणार नाही. पहिल्यांदाच ही सुविधा मंदिर समितीने दिली असून भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच रांगेत उभारणाºया भाविकांना मंदिर समितीकडून शुद्ध  पिण्याचे पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता मंदिर समितीने स्वत: ३.५० लाख लिटर आरओच्या पाण्याची खरेदी केली आहे. तसेच नांदेड येथील सेवाभावी संस्थेने नगरपालिकेच्या बोअरवर आरओ फिल्टर यंत्रणा बसवली असून त्याद्वारे शुद्ध पाणी पुरवले जाणार आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरओ प्लांट मधूनही रांगेतील भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे नियोजन केले आहे.

दर्शन रांगेत असणार २० एलसीडी टीव्ही- पदस्पर्श दर्शन रांगेत उभे असणाºया भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने यंदा प्रथमच विविध ठिकाणी २० एलसीडी टीव्हीचे ८ बाय १२ चे स्क्रीन बसविण्यात येणार आहेत़ त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना मंदिरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन होणार आहे़ 

विठ्ठल दर्शन रांगेत सुमारे दीड लाख भाविक एकाचवेळी उभा राहू शकतील, अशी व्यवस्था केली आहे. शिवाय त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, पायाला क्रश खडी टोचू नये, पाऊस, चिखलापासून संरक्षण व्हावे म्हणून मॅट अंथरले आहेत. त्यामुळे भाविकांनी या सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा आणि प्रशासनास सहकार्य करावे.- सचिन ढोले,कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर