शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतला; मुलानं दहा फूट जिन्यावरून मारली उडी

By विलास जळकोटकर | Updated: April 10, 2023 18:26 IST

आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतला म्हणून मुलाने १० फूट जिन्यावरून उडी मारली. 

सोलापूर: हल्लीची पिढी मोबाइलच्या फार आहारी गेली आहे. मोबाइल हेच सर्वस्व मानू लागली आहे. या मोबाइलरूनच सोलापुरातील तरुणाने आई-वडिलांनी मोबाइल हातातून घेतल्याने चिडून चक्क दहा फूट उंचीच्या बेसमेंटवरून उडी मारली. सोमवारच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. पृथ्वी संतोषकुमार शिंदे (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

उत्तर सदर बझार परिसरातील भारत हौसिंग सोसायटीत संतोषकुमार शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे कुटुंबातील सर्वांनी जेवण आटोपले. मुलं मोबाइवर फार वेळ पाहत बसत असल्याने संतोषकुमार शिंदे यांनी रविवारी रात्री बारा वाजल्यानंतरही मुलगा पृथ्वी हा मोबाइलवर पाहत असल्याने त्याकडून मोबाइल काढून घेतला. 

या प्रकारामुळे चिडलेल्या पृथ्वी याने कोणताही विचार न करता तो थेट जिन्यावरील बेसमेंटवर गेला आणि दहा फूट उंचीवरून त्याने उडी घेतली. यामुळे त्याच्या दोन्ही पायांना मुका मार लागला. दोन्ही हातांनाही खरचटले. तो विव्हळू लागला. काय झाले ते पाहण्यासाठी आई-वडील बाहेर आले तर मुलगा खाली पडल्याचे दिसले. रात्रीच्या वेळी आरडाओरडण्याने आजूबाजूची मंडळी जागी झाली. तातडीने वडिलांनी त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूर