शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दोन एकर डाळिंबाची बाग जळून खाक; शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान 

By रेवणसिद्ध जवळेकर | Updated: March 25, 2023 16:47 IST

शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान 

रेवणसिद्ध जवळेकर

मंगळवेढा - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन गणेशवाडी  (ता.मंगळवेढा) येथील एका शेतकऱ्याची लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी डाळिंब बाग , ठिबक सिंचन पाईप जळुन खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे सदरील शेतकरी  पूर्णतः रस्त्यावर आला असून त्याच्या डोळ्यादेखत त्याचे उपजीविकेचे साधन जळत असतांना त्याना  व त्याच्या कुटुंबियांना आश्रु अनावर झाले होते.   

आनंद दामू गुंगे  यांची  गणेशवाडी शिवारात गट नंबर १०२ /२/अ मध्ये दोन एकर डाळिंब शेती असुन यात ६००च्या आसपास झाडांची फळाला लागलेली डाळिंब बाग आहे. याच शेतात हायवेवरील लाईन शिफ्ट केली असून यावरील जम्प तुटलेला होता येथे लग्ज घालण्यात आला नव्हता . तारेचा पीळ दिला होता त्यामुळे  वारंवार घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या  याबाबत  महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बदलण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडून  सर्वच्या सर्व ६०० डाळिंब झाडे जळून खाक झाली.तेच ठिबक सिंचन पाईप  जळून खाक झाले आहेत. डाळिंब बाग जोपासण्यासाठी शेतकरी गुंगे व त्यांच्या कुटुंबियांनी खूप मेहनत केली होती. उन्हा-तान्हात कष्ट तर केलेच शिवाय झाडा़ना फळधारणा व्हावी म्हणून रासायनिक खते व औषधासाठी  मोठा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून ते केव्हाही तुटतात. एकत्र जमा होतात. त्यामुळे ताराखाली असलेला शेतकऱ्यांची शेती जळून जाते.  मंगळवेढा नगरपालिका अग्निशमक दलाने तत्काळ बोलवून सदरचे आग विझवण्याचा प्रयत्न केला असून जळालेल्या डाळिंब बागेची नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी आनंद गुगे यांनी महावितरण उपकार्यकारी अभियंता यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे मात्र महावितरण अधिकारी अद्याप इकडे फिरकले नाहीत.

शॉर्टसर्किट मुळे माझी दोन एकर डाळिंब बाग व ठिबक सिंचन सह अन्य साहित्य जळून सहा लाखाचे नुकसान झाले आहे. महावितरणकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी   आनंद गुंगे , शेतकरी 

 

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर