शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! तब्बल १० हजार वाहनधारकांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन; दहा महिन्यांत १० कोटींचा दंड

By appasaheb.patil | Updated: December 2, 2022 16:07 IST

रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी शासनाकडून प्रवासी वाहनांना ‘ स्पीड लॉक ’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सोलापूर -

रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी शासनाकडून प्रवासी वाहनांना ‘ स्पीड लॉक ’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनेक वाहनांमध्ये हे बसविले गेले नाही. बसविलेल्या वाहनांमध्ये काही वाहनधारकांनी छेडछाड केली आहे. दरम्यान, स्पीड लॉक न बसविणे व छेडछाड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. ज्या वाहनांनी ‘ स्पीड लॉक ’ बसवले नाही अशा वाहनांनी त्वरित ‘ स्पीड लॉक ’ बसवून घ्यावे अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे असेही आरटीओ प्रशासनाने कळविले आहे.दरम्यान, मागील दहा महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार वाहनधारकांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले असून त्यांना दहा कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.प्रवासी वाहनात ‘ स्पीड लॉक ’ आवश्यकवेगात गाडी चालविल्याने अपघाताची शक्यता दाट असते. अनेक वाहनचालक वेगात वाहन चालवितात परिणामी अपघात होतो, त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवू नये. प्रवासी वाहनात ‘ स्पीड लॉक ’ लावणे आवश्यक आहे.१० हजार वाहनांना २ कोटींचा ठोठावला दंडभरधाव वेगात वाहने चालविल्याने सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हद्दीत दररोज अनेक अपघात होतात. मागील दहा महिन्यांत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेने ९ हजार ४७० वाहनांना वेग मर्यादेचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ कोटी ८८ लाख ५८ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पाेलिस निरीक्षक महेश स्वामी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

तर परवाना १२० दिवसांपर्यंत निलंबित होते...विना परवाना चोरटी प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कलम ६६/१९२-अ अन्वये न्यायालयीन कारवाई होऊन रुपये ५ हजारापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन १२० दिवसांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. अशा प्रवासी वाहतुकीस विम्याचे संरक्षण नसते.

टॅग्स :Solapurसोलापूर