शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिक्षिकेवर २९ वर्षे अत्याचार; सपाटेंच्या अटकेसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चा आक्रमक 

By appasaheb.patil | Updated: September 22, 2022 15:25 IST

जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दिले निवेदन

सोलापूर : मराठा समाज सेवा मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी हायस्कूल, सोलापूर येथील शिक्षकेवर १५ ऑगस्ट १९९३ ते २८ जून २०२२ या कालावधीत छत्रपती शिवाजी शाळा, शिवपार्वती लॉज व वसंत विहार येथील पत्राशेडमध्ये अत्याचार झाल्याची लेखी तक्रार एका पीडित शिक्षिकेने १९ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस उपयुक्त यांच्याकडे केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

जिथे शिक्षणासारखे पवित्र कार्य चालते अशा पवित्र ठिकाणी मनोहर सपाटे यांच्यासारखे संस्था अध्यक्ष पदाचा धाक दाखवून जर असे वागत असतील तर त्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. तसेच इतरांवरही अन्याय-अत्याचार झाल्याची विश्वसनीय माहिती मिळालेली आहे. त्यामुळे मराठा समाज सेवा मंडळ या संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांची चौकशी करून सपाटेवर गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.

मराठा समाजात शैक्षणिक प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने कै. ॲड. ए. तु. माने, ब्रम्हदेव माने, निर्मलाताई ठोकळ, शंकरराव कोल्हे, जगन्नाथ भोईटे यासह सोलापूरच्या मराठा समाजातील लोकांनी वर्गणी काढून स्थापन केलेल्या या संस्थेच्या शाळेतच मराठा शिक्षिकेवर अन्याय-अत्याचार झालेला आहे. याबाबत सर्वसामान्य मराठ्यांच्या तीव्र भावना असून व संस्थाध्यक्ष सपाटे यांचेविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मनोहर सपाटेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून संबधित संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून निपक्ष तपास करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर दास शेळके, नानासाहेब काळे, दिलीपभाऊ कोल्हे, सुनिल रसाळे, शशि थोरात, प्रताप चव्हाण, तुकाराम मस्के, बजरंग आवताडे, शेखर फंड, सोमेश पवार, उत्तम खुटे, रामचंद्र कदम, डी. एन. जाधव, जयवंत सुरवसे, विजय पोखरकर आदींनी सह्या केल्या आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाEducationशिक्षण