सांगली : देशसंरक्षणाचं सतीचं वाण जपणाऱ्या वीर जवानांना राखी बांधून बहीण-भावाच्या नात्याला देशपे्रमाचं परिमाण देण्यासाठी तमाम भगिनींसाठी ‘लोकमत’मार्फत राखी पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आपली राखी ७ आॅगस्टपर्यंत नजीकच्या ‘लोकमत’ कार्यालयात जमा करावी.नातं बहीण-भावाचं... प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, भारतभूचं रक्षण करणाऱ्या वीर जवानांचं आणि भगिनींचं नातंही असंच... आता या प्रेमळ नात्याला घट्ट बांधून ठेवणार आहे, राखीचा रेशीम धागा. भगिनींनी आपली राखी सांगली : ‘लोकमत’ भवन, कलाश्री आर्केड, दुसरा मजला राममंदिर कॉर्नर, सांगली. मिरज : ‘लोकमत’ कार्यालय, हिरा हॉटेलसमोर, वेदिका हाईटस्, गाळा क्रमांक ५, शिवाजी रोड, मिरज. इस्लामपूर : ‘लोकमत’ कार्यालय, के. बी. पी. कॉलेज रोड, स्मिता बुक सेलर्स शेजारी, इस्लामपूर. विटा : ‘लोकमत’ कार्यालय, ड्रिमलॅण्ड इमारत, गाळा क्रमांक ४, एसटी स्टॅण्ड रोड, विटा, येथे जमा करावी. (प्रतिनिधी)देशप्रेमाचे परिमाणदेशाच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या वीर जवानांना राखी बांधून बहीण-भावाच्या नात्याला देशपे्रमाचं परिमाण देण्यासाठी तमाम भगिनींसाठी ‘लोकमत’मार्फत राखी पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
वीर जवानांसाठी राखी पाठविण्याचे आवाहन
By admin | Updated: August 5, 2014 00:13 IST