शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अँटीबॉडीज चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 13:12 IST

पंचवीस हजार किटची मागणी; रॅपिडऐवजी आता प्रयोगशाळेच्या चाचण्यांवर भर

ठळक मुद्देअँटीबॉडीज चाचणी केल्यावर संबंधीत व्यक्तीला कोरोना संसर्ग होऊन गेला आहे काय हे स्पष्ट होतेशरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजवरून ही बाब स्पष्ट होत असल्याने त्या व्यक्तीची काळजी दूर ज्या व्यक्तींमध्ये अशा अँटीबॉडीज नसतील त्यांना इतरांपासून दूर ठेवण्याची सूचना करून कोरोनापासून बचाव करता येणे शक्य होणार

सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रॅपिड अँटिजेनऐवजी प्रयोगशाळेतील चाचण्यांवर भर दिला जाणार आहे. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी ज्येष्ठ लोकांची अँटीबॉडीज टेस्ट करण्यासाठी किटची आॅर्डर दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

जुलै व आॅगस्ट महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. आॅगस्ट महिन्यात मृत्यूदर वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाला बळी पडणाºयांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींचे प्रमाण जास्त असून त्यांना वेळेत उपचाराबरोबरच आरोग्य तपासणीकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. ग्रामीणमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या अँटीबॉडीज टेस्ट करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात २५ हजार व नंतर आणखी दहा हजार किट पुरविण्याबाबत संबंधीत कंपनीकडे आॅर्डर नोंदविण्यात आली आहे. 

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामीणमधील स्थितीचा आढावा घेतला आहे. पंढरपूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा येथे रुग्ण आढळून येत असल्याने रॅपिड अँटीजेन चाचण्यांऐवजी प्रयोगशाळेतील चाचण्यांवर भर देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे आता नियोजन करण्यात येत आहे. 

आता ग्रामीणला आहे गरज शहरातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले होते. महापालिकेचे आरोग्य अधिकारी संतोष नवले ऐनवेळी रजेवर गेल्याने क्षयरोग विभागाचे उपसंचालक डॉ. शीतल जाधव यांच्याकडे महापालिकेचा पदभार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला. त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, विजय लोंढे, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांच्याबरोबर अनेक कर्मचारी व शिक्षकांची सेवा महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. आयुक्त पी. शिवशंकर यांनी नियोजन करून शहरातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणला व मृत्यूदरही कमी केला आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. 

काय होईल फायदाअँटीबॉडीज चाचणी केल्यावर संबंधीत व्यक्तीला कोरोना संसर्ग होऊन गेला आहे काय हे स्पष्ट होते. शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजवरून ही बाब स्पष्ट होत असल्याने त्या व्यक्तीची काळजी दूर होते. ज्या व्यक्तींमध्ये अशा अँटीबॉडीज नसतील त्यांना इतरांपासून दूर ठेवण्याची सूचना करून कोरोनापासून बचाव करता येणे शक्य होणार आहे. 

झेडपी कर्मचारी परत पाठवामे, जून आणि जुलै महिन्यात सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकाºयांची सेवा महापालिकेकडे वर्ग करण्यात आली होती. आता जिल्ह्यात कोरोना वाढल्याने झेडपीचे अधिकारी व कर्मचारी परत पाठवा, अशी मागणी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल