शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावच्या सर्पमित्राला सापांचा लागलाय लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:07 IST

नागपंचमी विशेष; जनतेत करताहेत प्रबोधन

ठळक मुद्देअंजनगाव खेलोबा येथील सर्पमित्र सनातन नाईकनवरे सापांना धरून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्याचे काम करत आहेतमाढा शहर व परिसरात आजपर्यंत लहान-मोठे जवळपास दीड हजार विषारी-बिनविषारी सर्प अत्यंत चपळाईने पकडून त्यांना सुरक्षित जंगलात सोडले सापांविषयी असणारी भीती त्यांनी अनेकांच्या मनातून घालवून अंधश्रद्धा घालवली

आयुब शेखमाढा : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील सर्पमित्र सनातन नाईकनवरे सापांना धरून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्याचे काम करत आहेत. सापांप्रती असणारी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी अशा सापांचे प्रदर्शन ते भरवतात़ मागील ३० वर्षांत त्यांनी सापांशी मैत्रीच केली़ लागलेला लळा अजूनही सुटलेला नाही.  ते सर्प संवर्धन फाउंडेशनचे सदस्य आहेत़ माढा शहर व परिसरात आजपर्यंत लहान-मोठे जवळपास दीड हजार विषारी-बिनविषारी सर्प अत्यंत चपळाईने पकडून त्यांना सुरक्षित जंगलात सोडले आहे़ लहानपणामध्ये गावात सापाचा खेळ पाहून त्यांच्या मनात सापांबद्दल आत्मियता निर्माण झाली़ त्यामुळे त्यांच्या मनातील भीती गेली़ वयाच्या बाराव्या वर्षांपासून सापांचा छंद जोपासत आहेत़ 

माढा शहर, अनगर, विठ्ठलवाडी, देवडी, वाफळे, कुंभेज, खैराव, उपळाई खुर्द, उपळाई (बु़), कोंबडवाडी या परिसरात, शेतात, वस्तीवर सापाचं दर्शन झाले की अंजनगावमधून फोन करून पाचारण केले जातेi. त्यांनी आतापर्यंत सापांपासून अनेकांचे प्राण वाचवले आहेत़ याबरोबरच सापांविषयी असणारी भीती त्यांनी अनेकांच्या मनातून घालवून अंधश्रद्धा घालवली आहे़ भैय्या पाटेकर, भागवत चौगुले, सचिन चौगुले, समाधान नाईकनवरे, संदीप लटके, अतुल काळे, रामचंद्र रावडे, बिभिषण चौगुले असे अनेक सर्पमित्र त्यांनी घडवले आहेत़ 

१५ वेळा सर्पदंश आपल्या देशात नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे चार जातीचे विषारी साप आहेत़ आपल्या परिसरामध्ये नाग व घोणस या दोन विषारी  सापांचे प्रमाण अधिक आहे़ सापांना हाताळत असताना आतापर्यंत त्यांना जवळपास पंधरावेळा दंश केला आहे़ या सर्पदंशात त्यापैकी पाच विषारी नाग होते़ दहा वर्षांपूर्वी अंजनगाव खेलोबा येथे दिलीप चौगुले यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर नागाने डाव्या हाताच्या अंगठ्यावर दंश केला़ त्याक्षणी नवीन ब्लेडने रक्त बाहेर काढले आणि सर्वात सर्पदंश झालेल्या वरील बाजूस पट्टीने बांधून विष पसरवणे तत्काळ थांबवले़ 

 साप शेतकºयांचा मित्रच- साप हा शेतकºयांचा मित्र आहे़ तो शेतातील उंदरांची संख्या कमी करून अप्रत्यक्षरीत्या मदत करतो़ - अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंजनगावात नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्षात साप ठेवून महिलांकडून त्याची पूजा  करण्याची संधी देतात़ - तो दूध पीत नाही़ त्याला कान नाहीत़ त्याला मेंदू नाही ना त्याला स्वत:चे घर नाही़ त्याला केस नसतात़- तो शेतकºयाचा मित्र आह़े  पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी त्याला साथ दिली पाहिजे

टॅग्स :Solapurसोलापूर