शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी; जाणून घ्या सविस्तर अटी व शर्ती

By appasaheb.patil | Updated: January 6, 2023 20:14 IST

आप्पासाहेब पाटील, सोलापूर  : महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद करण्यात आलेले होते. जिल्ह्यामध्ये ...

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद करण्यात आलेले होते. जिल्ह्यामध्ये गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झाल्याने ८ सप्टेंबर २०२२ चे आदेशान्वये लागू केलेले निर्बंध अंशतः शिथिल करण्यात आले असून. जिल्ह्यात केवळ म्हैस प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे व बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांनी निर्गमित  केले आहेत.

जिल्ह्यामध्ये गोवंशीय प्राण्यांचे  (गाय, बैल व वासरे ) बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. म्हैस प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे व बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येत असून वाहतूक अधिनियम २००१ मधील प्राण्यांची वाहतूक नियमांचे पालन करुन तसेच, जनावरांचा आरोग्य दाखला सोबत असणे बंधनकारक राहील. संबंधित ठिकाणी बाजारामध्ये जंतुनाशक फवारणी करणे बाजार समितीस अथवा आयोजकास बंधनकारक राहील.

महाराष्ट्र शासन अधिसूचना २१ नोव्हेंबर २०२२ नुसार जिल्ह्यामध्ये राज्यातील अमरावती व नाशिक महसुली विभागातील कोणत्याही जिल्ह्यामधून सोलापूर जिल्ह्यात गुरांची ने आण करता येणार नाही. तसेच पुणे, औरंगाबाद, नागपूर या महसुली विभागातून केवळ संक्रमित नसलेल्या आणि लसीकरण केलेल्या गुरांची सोलापूर जिल्ह्यामध्ये ने आण व वाहतूक  परवानगी देण्यात येत आहे. तसेच  सक्षम प्राधिकाऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र व  अधिनियम २००१ मधील वाहतूक नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये यात्रेनिमित्त किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राण्यांचे प्रदर्शन भरविण्यास किंवा बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास कोणतीही परवानगी देण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले असुन लम्पी चर्मरोगाचा त्या भागातील प्रादुर्भाव व लागण असल्याचे प्रमाण विचारात घेऊन परिस्थितीनिहाय परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर