शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सोलापुरातील संतप्त महिला पोलिसानं ठणकावलं, ‘अरे... पैसे देते की रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:39 IST

गुजरातहून आलेल्या वृद्धेला कोरोनाच्या संशयानं दवाखान्यात हलवताना रिक्षाचालकानं पोलिसाला विचारलं, ‘पैसे कोण देणार ?’

ठळक मुद्देअहमदाबादहून आलेली महिला नळबाजार चौकात आपल्या पिशव्यांसह बसलेली पाहून स्थानिक लोकांना कोरोनाबाबतचा संशय आलानळबाजार चौकात एका बंद दुकानासमोर एक महिला आपल्या पिशव्यांसह बसली होतीस्थानिक लोकांनी तिला कुठून आला आहात अशी विचारणा केली. तेव्हा त्या महिलेने मी अहमदाबाद येथून आल्याचे सांगितले

संताजी शिंदे 

सोलापूर : अहमदाबादहून आलेली महिला नळबाजार चौकात आपल्या पिशव्यांसह बसलेली पाहून स्थानिक लोकांना कोरोनाबाबतचा संशय आला. माहिती समजताच सदर बझार पोलीस ठाण्याचे कर्मचारी गाडीतून चौकात आले. तिला शासकीय रुग्णालयात पाठवायचे होते; मात्र कोणी तयार होईना. रस्त्यावरून जाणाºया एका रिक्षा चालकास आवाज दिला, तो संकोच करीत असल्याचे पाहून महिला पोलीस कर्मचाºयाने आरे पैसे देते रे बाबा ये इकडं..., फुकट घेऊन जाऊ नको असे म्हणत रिक्षातून शासकीय रुग्णालयात पाठविले. कोरोना व्हायरसमुळे सर्वजण चिंतेत होते. 

नळबाजार चौकात एका बंद दुकानासमोर एक महिला आपल्या पिशव्यांसह बसली होती. स्थानिक लोकांनी तिला कुठून आला आहात अशी विचारणा केली. तेव्हा त्या महिलेने मी अहमदाबाद येथून आल्याचे सांगितले. हे एकूण स्थानिक लोकांनी प्रथमत: पोलीस व स्थानिक नगरसेवक भारतसिंग बडुरवाले यांना माहिती दिली. चौकात आलेल्या पोलीस व भारतसिंग बडुरवाले वृद्ध महिलेकडे चौकशी केली; मात्र महिला स्पष्ट काही बोलत नव्हती,ती अहमदाबाद येथून आली असून नातेवाईकांकडे जायचं आहे असं सांगत होती. तिला शासकीय रुग्णालयात घेऊन जायचे कसे? असा प्रश्न पोलिसांना पडला. एक मीटर अंतरावर राहून सर्वजण तिला शासकीय दवाखान्यात पाठवण्याची चर्चा करू लागले. 

महिला पोलीस कर्मचाºयाने रस्त्यावरून जाणाºया एका रिक्षावाल्यास आवाज दिला. रिक्षाचालक थांबला खरा; मात्र तो संकोच करीत होता. तेव्हा महिला पोलीस कर्मचाºयाने त्याला आरे पैसे देते रे बाबा ये इकडं, फुकट घेऊन जाऊ नको असे म्हणत जवळ बोलावले. पोलिसांनी वृद्ध महिलेस रिक्षात बसण्याची विनंती केली. वृद्ध महिला उठली व रिक्षात बसली, तेव्हा पोलिसांनी रिक्षा चालकास तोंडाला रुमाल बांधण्यास सांगितले. रिक्षा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने निघून गेली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. 

वृद्धेची तपासणी केली अन् सोडून दिले- भारतसिंग बडुरवालेवृद्ध महिला चौकात बसल्यानंतर आम्हाला लोकांनी माहिती दिली, तिच्याकडे विचारणा केली असता ती इथे नातेवाईक असल्याचे सांगत होती. तिला त्यांचा पत्ता माहीत नव्हता, अहमदाबाद येथून आल्याने आम्ही प्रथमत: तिला शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. डॉक्टरांनी तपासणी केली, वृद्ध महिलेस काही लक्षणे नसल्याचे पाहून परत पाठवले. पुन्हा महिलेस नळबझार चौकात सोडले, ती नातेवाईकाच्या शोधात निघून गेली अशी माहिती नगरसेवक भारतसिंग बडुरवाले यांनी दिली. 

व्हॅनमधून घेऊन जाण्याचे धाडस होईना- नळबाजार येथे अहमदाबाद येथून आलेली वृद्ध महिला बसल्याची माहिती समजताच, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व्हॅनमधून आले. चौकशी केल्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात सोडायचे असे असा प्रश्न पडला? मात्र कोरोनाच्या धास्तीने तिला पोलीस व्हॅनमधून घेऊन जाण्याचे धाडस पोलिसांना होत नव्हते

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसauto rickshawऑटो रिक्षा