शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बायको माहेरहून येत नसल्यानं संताप, उंदिर मारण्याचं विष केलं प्राशन

By विलास जळकोटकर | Updated: August 23, 2023 19:34 IST

शिवाजी लिंबू वाघमारे (वय- २५) असे या तरुणाचे नाव आहे.यातील तरुण शिवाजी याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.

विलास जळकोटकर / सोलापूर 

सोलापूर : सध्या मुला-मुलींच्या जन्मदरामध्ये तफावत असल्यामुळे लग्न जमणे ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक लग्नाळू तरुण, त्यांच्या पालकांना ही समस्या भेडसावते आहे. तर लग्न झालेल्यांच्याही समस्याही वाढू लागल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात एका लग्न झालेल्या तरुणानं बायको माहेरहून येत नसल्यानं रागाच्या भरामध्ये चक्क उंदिर मारण्याचं विष प्राशन केलं. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास मालवंडी (ता. बार्शी) येथे ही घटना घडली. 

शिवाजी लिंबू वाघमारे (वय- २५) असे या तरुणाचे नाव आहे.यातील तरुण शिवाजी याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. घरगुती कारणावरुन त्यांची पत्नी माहेरी गेली होती. ती परत येत नसल्याचे शल्य त्याला नेहमीच असायचे. यातून नेहमीच नैराश्य यायचे. मंगळवारी त्याला विरह सहन झाला नाही. रागाच्या भरामध्ये आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्याने मालवंडी गावात राहत्या घरी घरात उंदिर मारण्यासाठी आणलेले औषध गुपचूप प्राशन केले. थोड्यावेळाने त्रास होऊ लागला. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्याला वैराग येथील सरकारी दवाखान्यात हलवले. येथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांचे नातलग नागुराव कासूळकर यांनी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, रुग्ण शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर