शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीतून माहिती भरता येईना सोलापुरातील अंगणवाडीताईंनी मोबाईल केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 17:35 IST

१६४ जणींचा एल्गार: हँडसेट बदलून मराठी ॲप देण्याची मागणी

सोलापूर : वारंवार हँग होणारे जुने हँडसेट अशात पोषण ट्रॅकरवर इंग्रजीतून माहिती भरता येईना म्हणून वैतागलेल्या शहरी अंगणवाडीतील १६४ अंगणवाडी सेविकांनी सोमवारी सुपर मार्केट येथील कार्यालयात धाव घेऊन हँडसेट जमा केले.

अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाजाची नोंद ऑनलाईन अपडेट करण्यासाठी सन २०१९मध्ये मोबाईल हँडसेट देण्यात आले आहेत. यासाठी केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर ॲप दिला असून, यावर सेविकांना दररोज लाभार्थींचे नाव, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती महिला, पोषण आहार वाटपाची माहिती भरायची आहे. माहिती भरण्याचे काम इंग्रजीतून असल्याने कमी शिक्षण असलेल्या सेविकांना अडचणीचे ठरत आहे. याशिवाय मोबाईल दोन वर्षाचे जुने झाल्याने रॅम स्लो असून, वापर करताना गरम होतात. बऱ्याचदा मोबाईल हँग झाल्याने माहिती भरता येत नाही. त्यामुळे सेविकांना दररोज वरिष्ठांची बोलणी खावी लागत आहेत. हँडसेट बदलून मराठी ॲप द्यावे, अशी मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

त्यामुळे वैतागलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी शहरी अंगणवाडी विभागाच्या सुपर मार्केटमधील कार्यालयात धाव घेतली. १६४ जणांनी आपले हँडसेट कार्यालयात परत केले. यावेळी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, सरला चाबुकस्वार, कांचन पांढरे उपस्थित हाेते.

सर्व हँडसेट परत करणार

  • ग्रामीणमध्ये ४ हजार २११, तर शहरी भागात ५१९ अंगणवाड्या आहेत. अशा ४ हजार ७३३ सेविकांकडे व १५१ मुख्य सेविकांकडे मोबाईल हँडसेट आहेत. यातील ॲपमध्ये डिलीटचा पर्याय नाही, वर्गवारी, लाभार्थी गट बदलता येत नाही, ॲपवर काम करणे किचकट असल्याने जिल्ह्यातील सर्व सेविका हा मोबाईल शासन जमा करणार असल्याचे संघटनेचे सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.
  • शासनाच्या मोबाईलवर इंग्रजीतून माहिती भरता येत नसल्याने वैतागलेल्या अंगणवाडीताईंनी शहरी आरोग्य केंद्राच्या सुपर मार्केट येथील कार्यालयात जाऊन निदर्शने करीत हँडसेट जमा केले.
टॅग्स :Solapurसोलापूरanganewadi jatraआंगणेवाडीMobileमोबाइलGovernmentसरकार