शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्या टॅक्सीचालकाच्या गावी पोहोचली आरोग्य खात्याची टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 11:55 IST

गुरसाळेच्या त्या टॅक्सीचालकाच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ; सोशल मिडियावरील अफवांमुळे ग्रामस्थ हैराण

ठळक मुद्देगुरसाळे (ता. माळशिरस) येथील एका कुटुंबातील सदस्याला पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागणवरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनेने आरोग्य सेवक बी. डी. कांबळे यांनी संबंधित कुटुंबाची, त्याच्या घराची पाहणी केली

सचिन कांबळे पंढरपूर : गुरसाळे (ता. माळशिरस) येथे पूर्वी स्थायिक असलेल्या एका व्यक्तीला पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी सर्वत्र पसरली अन् त्यांच्या नातेवाईकाचा फोन दिवसभर वाजू लागला. यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य अस्वस्थ झाले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

मांजरी (जि. पुणे) येथे माझ्या भावाचा मुलगा एका कार भाड्याने देणाºया कंपनीमध्ये चालक म्हणून काम करतो. त्या ठिकाणी त्याच्या इतरही गाड्या आहेत. 

कोणत्यातरी कारणाने त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजते. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी त्याच्या मुलाचे व पत्नीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचा अहवाल संध्याकाळी कळणार असल्याचे सांगण्यात आले. तो प्रत्येक वर्षी त्याच्या कुटुंबीयांसह गावच्या यात्रेसाठी गुरसाळे येथे येतो. मात्र गेल्या एक वर्षांपासून तो गावाकडे आला नाही. पुढच्या महिन्यात सणानिमित्त येणार होता.

त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी प्रसिद्ध होताच, आमच्या घरामधील सदस्यांना विविध स्तरातील लोकांचे फोन येत आहेत. त्याची तब्येत ठीक आहे का? तो बरा आहे का? याबाबत उत्तरे देऊन आम्ही  परेशान झालो आहे. वास्तविक पाहता आम्ही त्याला पाहण्यासाठी गेलो नाही. कारण त्याला भेटण्यासाठी सोडतच नाहीत. फक्त मोबाईलवरून त्याच्या आरोग्याबाबत विचारपूस सुरू आहे. यामुळे आम्हाला गावकºयांकडून कसलाही त्रास होत नाही. परंतु गावातील लोक त्रास देत  असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितले.

आरोग्य सेवकाकडून पाहणी- गुरसाळे (ता. माळशिरस) येथील एका कुटुंबातील सदस्याला पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी समजताच वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनेने आरोग्य सेवक बी. डी. कांबळे यांनी संबंधित कुटुंबाची, त्याच्या घराची पाहणी केली. परंतु त्या ठिकाणी सर्व व्यवस्थित असल्याचे त्यांना आढळून आले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्यMedicalवैद्यकीयPandharpurपंढरपूर