शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
3
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
4
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
5
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
6
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
7
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
8
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
9
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
10
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
11
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
12
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
13
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
14
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
16
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
17
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
18
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
19
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
20
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
Daily Top 2Weekly Top 5

..अन् क्वारंटाईन दुधवाल्याला घरी न सोडताच अ‍ॅम्ब्युलन्स परत फिरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:59 IST

क्वारंटाईनचे १४ दिवस पूर्ण; शहरभर झाला होता चर्चेचा विषय 

ठळक मुद्देक्वारंटाईनचा कालावधी संपलेल्यांना घरी सोडण्यासाठी केगावहून अ‍ॅम्ब्युलन्स निघालीअ‍ॅम्ब्युलन्स शनिवारपेठेत आली असता कॉल आल्याने संबंधित व्यक्तीला घरी न सोडताच परतली

राजकुमार सारोळे

सोलापूर : केगाव येथील संस्थात्मक क्वारंटाईनमधून १४ दिवस पूर्ण झालेल्यांना घरी सोडण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स निघाली अन् शहरातील एका दुधवाल्याला घराजवळ सोडणार तोच कॉल आल्यामुळे सायरन वाजवित अ‍ॅम्ब्युलन्स पुन्हा माघारी वेगाने परतल्याची घटना घडली.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठ आणि सिंहगड कॉलेजच्या इमारतीत क्वारंटाइन करून ठेवले जात आहे. या ठिकाणी १४ दिवस या लोकांना निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे उपचारासाठी पाठविले जाते.

बुधवारी सकाळी क्वारंटाईनचा कालावधी संपलेल्यांना घरी सोडण्यासाठी केगावहून अ‍ॅम्ब्युलन्स निघाली. ही   अ‍ॅम्ब्युलन्स शनिवारपेठेत आली असता कॉल आल्याने संबंधित व्यक्तीला घरी न सोडताच परतली. त्यामुळे याबाबत शहरात वेगवेगळी चर्चा सुरू झाली. अ‍ॅम्ब्युलन्स ज्या व्यक्तीला सोडण्यासाठी निघाली होती त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना परत घेऊन अ‍ॅम्ब्युलन्स परतली.

दुधवाला होता आनंदात- अ‍ॅम्ब्युलन्स एका दुधवाल्या मामाला घरी सोडण्यासाठी निघाली होती. तेलंगी पाच्छापेठेतील किराणा दुकानदाराच्या घरी दूध पुरवित असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईनचे १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांना बुधवारी घरी सोडण्यात येत होते. त्यामुळे दुधवालामामा आनंदात असतानाच अचानक कॉल आल्याने अ‍ॅम्ब्युलन्स दुधवाले मामांना घरी न सोडताच परतली. त्यामुळे शहरभर हा विषय चर्चेचा झाला आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमधून कोणत्याही रुग्णाला सोडण्यात आलेले नाही. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो त्यांना आम्ही अ‍ॅडमिट करून घेतो. पॉझिटिव्ह नसेल तर क्वारंटाईनच्या ठिकाणी हलविले जाते.डॉ. औदुंबर मस्केअधीक्षक, सिव्हिल हॉस्पिटल

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल