शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

संतमेळा पंढरीत; अवघा झाला आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 05:34 IST

अवघ्या काही तासात शिवशाही बसने दिमाखात आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी वाखरीत एकमेकांची भेट घेतल्यानंतर नाचत गात हा सोहळा रात्री पंढरीत दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

पंढरपूर : अवघ्या काही तासात शिवशाही बसने दिमाखात आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी वाखरीत एकमेकांची भेट घेतल्यानंतर नाचत गात हा सोहळा रात्री पंढरीत दाखल झाला. वाखरीच्या पालखी तळावर सर्व पालख्यांचे स्वागत  श्री  विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने करण्यात आले तर इसबावी येथे संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्यावतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले. 

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपानकाका,संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत तुकाराम, संत निळोबाराय, संत चांगावटेश्वर व संत रुक्मिणीमाता यांच्या पालख्या वाखरीत एकत्र आल्या. त्यांच्या स्वागतासाठी पंढरपुरातून संत नामदेव महाराजांची पालखी आली होती. संतमेळा पंढरीत पारंपरिक व सांप्रदायिक उपचार पार पडल्यानंतर सर्वात पुढे संत नामदेव  व सर्वात शेवटी संत ज्ञानेश्वर माऊली या क्रमाने सर्व पालख्या रात्री खेळीमेळी पंढरीत दाखल झाल्या. मुख्यमंत्री पंढरपुरात आषाढीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सपत्नीक रात्री पंढरीत दाखल झाले. मुंबईहून पंढरपूरपर्यंत त्यांनी स्वत: कार चालवली. गतवर्षीही ते स्वत: गाडी चालवत पंढरपूरला आले होते.

वाखरी तळावर पालख्या खोळंबल्या

 प्रतिकात्मक वारीलाही सरकारने अटी घातल्याने नाराज असलेल्या वारकऱ्यांनी आज वाखरी तळावर आपली ताकद दाखवत सर्व ४० वारकऱ्यांना पायी चालण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी पालख्या थांबवून ठेवल्या. वाखरीत सर्व पालख्या आल्यानंतर पुढे निघण्यापूर्वी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख नितीन महाराज देहूकर यांनी ४० वारकऱ्यांना चालण्याची परवानगी देण्याचा मुद्दा मांडला. ४० जणांना चालण्यास परवानगी दिली, तरच वाखरीतून पालखी पुढे जाईल, असा आग्रह त्यांनी धरला. यास सर्व पालखी व्यवस्थापनाने पाठिंबा दिला. शेवटी प्रशासनाने ३० वारकऱ्यांना चालण्यास परवानगी दिल्याने सर्व सोहळे वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी