शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘तलाव दीपोत्सवा’साठी सर्वधर्मीयांचा पुढाकार; हीच बहुभाषिक सोलापूरची खरी ओळख...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 10:55 IST

‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागत : प्रकाशमय यात्रा-दीपोत्सव-२०२० च्या आवाहन पत्रिकेचे प्रकाशन

ठळक मुद्देबाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिलातमाम सोलापुरातील सर्वच जाती-धर्मातील घटकांनी दीपोत्सवात सहभागी दीपोत्सवाच्या माध्यमातून सोलापूरचे ब्रॅडिंगही होणार

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मंदिर परिसर अन् तलाव दीपोत्सवासाठी सर्वधर्मीयांनी पुढाकार घेतला असून, खºया अर्थाने हीच बहुभाषिक सोलापूरची खरी ओळख आहे. ती अधिक अधोरेखित करु या, असा निर्धार रविवारी सकाळी साखर पेठेतील सोन्नलगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात विविध जाती-धर्मांमधील मान्यवरांनी केला. लोकमतच्या ‘दीपोत्सव-२०२०’मध्ये  सर्वच जाती-धर्मातील घटकांना सामावून घेतल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी ‘लोकमत’चे तोंडभरुन कौतुकही केले. 

प्रकाशमय यात्रा-दीपोत्सव-२०२० या आवाहन पत्रिकेचे प्रकाशन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी सोन्नलगी मंदिरातील गाभाºयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी श्री सिद्धरामेश्वरांचा जयघोष करण्यात आला. 

यावेळी वीरशैव व्हिजनचे कुमार शिरसी, चिदानंद मुस्तारे, सचिन विभूते, सोमेश्वर याबाजी, बसवराज जमखंडी, राजेश नीला, मल्लिकार्जुन मल्लाडे, सोमनाथ चौधरी, अविनाश हत्तरकी, संजय साखरे, श्रीमंत मेरु, मेघराज स्वामी, मनोज पाटील, विजय बिराजदार, गणेश चिंचोळी, सिद्राम बिराजदार, शिवशंकर हत्तरकी, धानेश सावळगी, अमर दामा, गौरीशंकर अतनुरे, डॉ. संजय कळके, दीपक मड्डे, जी. एम. ग्रुपचे पप्पू गायकवाड, मार्कंडेय जनजागृती संघाचे नितीन मार्गम, किशोर व्यंकटगिरी, मुस्लीम समाजातील कार्यकर्ते जुबेर बागवान, मुद्दसर वड्डो, रशीद शेख, महमद रफिक पेरमपल्ली, अब्दुल समद माडी, मोहन क्षीरसागर, सोहन स्वामी, श्रीपाद बटगिरी, मनोज पाटील, डॉ. संजय कळके, महेश बटगिरी, दिगंबर बटगिरी, देविदास बटगिरी, उमेश काशीकर, राघवेंद्र जोशी, श्याम पुजारी, किसन गर्जे आदी उपस्थित होते. प्रवीण भुतडा यांनी आभार मानले. 

सोलापुरात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्याच गुण्यागोविंदाने ‘लोकमत’चा हा दीपोत्सव यशस्वी करुन पुन्हा एकदा सोलापूरकर मंडळी ‘हम साथ-साथ’ची प्रचिती आणून देतील. दीपोत्सवात मराठा समाजातील अनेकांना सामावून घेण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.-दास शेळके,ज्येष्ठ नेते- मराठा समाज. 

आजवर सोलापूरवर कुठलेच नैसर्गिक संकट आले नाही, ही सिद्धरामेश्वरांचीच कृपा म्हणावी लागेल. गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रेत मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. यंदा दीपोत्सवातही मुस्लीम समाजाचे मोठे योगदान राहील. सोलापुरातील राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दीपोत्सवाच्या माध्यमातून घडल्याशिवाय राहणार नाही.-अ‍ॅड. महिबूब कोथिंबिरे,अध्यक्ष- चिरागअली ट्रस्ट.

‘लोकमत’ने सात संघटनांमध्ये श्री मार्कंडेय जनजागृतीला स्थान दिल्यामुळे पद्मशाली समाजाचा मान उंचावला आहे. लक्ष दीपोत्सव हा सोहळा देखणा अन् नेटका करण्यासाठी माझ्यासह समाजातील नगरसेविका, विविध संघटना पुढाकार घेतील. सोन्नलगी मंदिर परिसरात विद्युतरोषणाई आणि कमान उभी करण्याबाबत मी प्रयत्नशील आहे. -सोनाली मुटकेरी,नगरसेविका भाजप.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासह सोलापूरच्या विविध उत्पादित वस्तूंचे ब्रॅण्डिंग होणे गरजेचे आहे. यासाठी पुढाकार घेणाºया ‘लोकमत’चे मी मनापासून कौतुक करतो. सर्वांनी मनापासून आपले योगदान दिले तर दीपोत्सव हा ‘न भूतो न भविष्यती’ असाच होणार आहे. दीपोत्सवाच्या माध्यमातून भाविकांची गर्दीही वाढणार आहे.-रंगनाथ बंग, हिंदू नववर्ष समिती

गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रेत मुस्लीम समाजातील अनेक व्यापाºयांनी आपल्या दुकानांवर, घरांवर विद्युतरोषणाई केली होती. यंदा दीपोत्सवच्या माध्यमातून सर्वच जाती-धर्मातील लोकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. सोलापूरकरांचा खºया अर्थाने हा उत्सव आहे. उत्सवात सर्वच घटकातील लोक पुढे आले पाहिजे. -जितेंद्र लाडव्यापारी.

गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रा तर यशस्वी झाली शिवाय चार प्रमुख सोहळ्यांमधील विधी वेळेत पार पडले. याचे संपूर्ण श्रेय ‘लोकमत’लाच जाते. यंदा त्यांनी विविध जाती-धर्मातील सात संघटनांना सोबत घेऊन दीपोत्सवाची संकल्पना मांडली आहे. घरातील एखादे कार्य समजून प्रत्येक घटकांनी योगदान दिले तर दीपोत्सव यशस्वी होईलच.-राजशेखर हिरेहब्बूमानकरी- श्री सिद्धरामेश्वर यात्रा. 

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला. यात्रेतही समतेची प्रचिती येते. यामुळे तमाम सोलापुरातील सर्वच जाती-धर्मातील घटकांनी दीपोत्सवात सहभागी झाले तर ‘लोकमत’च्या माध्यमातून ‘यात्रा समतेची’ याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. दीपोत्सवाच्या माध्यमातून सोलापूरचे ब्रॅडिंगही होणार आहे. -मोहन क्षीरसागरसामाजिक कार्यकर्ते -भावसार समाज

यंदाच्या लक्ष दीपोत्सवात मार्कंडेय जनजागृती संघाला सामावून घेतल्याबद्दल मी ‘लोकमत’ला धन्यवाद देतो. काही तरी नवीन संकल्पना यशस्वी केल्याशिवाय सोलापूरचे ब्रॅण्डिंग होणार नाही. दीपोत्सवाच्या माध्यमातून मार्कंडेय जनजागृती संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पद्मशाली समाजबांधव आपली शक्ती पणाला लावतील. -नितीन मार्गमश्री मार्कंडेय जनजागृती संघ.

गेल्या वर्षी ‘लोकमत’च्या पुढाकारातून अन् वीरशैव व्हिजनच्या सहकार्याने प्रकाशमय यात्रा यशस्वी झाली. यंदा याच ‘लोकमत’च्या पुढाकारातून विविध जाती-धर्मातील सात संघटनांच्या माध्यमातून दीपोत्सव-२०२० ही संकल्पना पुढे आली आहे. दीपोत्सवासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सर्वतोपरी सहकार्य राहील. -धर्मराज काडादीअध्यक्ष- देवस्थान पंच कमिटी

टॅग्स :SolapurसोलापूरLokmatलोकमतSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा