शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यातून ग्रीनफिल्डसाठी जमीन देणार नाही; शेतकऱ्यांचा एल्गार

By appasaheb.patil | Updated: February 25, 2023 18:56 IST

बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या निर्मीतीसाठी अक्कलकोट तालुक्यातील सोळा गावांमधून हा रस्ता जाणार आहे.या तालुक्यात बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत.

सोलापूर /अक्कलकोट :  बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या निर्मीतीसाठी अक्कलकोट तालुक्यातील सोळा गावांमधून हा रस्ता जाणार आहे.या तालुक्यात बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती गेल्यानंतर आमच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होणार आहे.त्यात कहर म्हणजे शासनाकडून एकरी अत्यल्प मोबदला जाहीर केल्याने आमच्यासमोर मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून समृद्धी महामार्ग प्रमाणे गुंठेवारी पद्धतीने आम्हाला भरघोस मोबदला द्या अन्यथा अक्कलकोट तालुक्यातून या प्रकल्पासाठी जमीन देणार नाही अशी भूमिका चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

अक्कलकोट येथे बाधित शेतकऱ्यांची आक्रोश सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, भाजपा महिला अध्यक्षा, सुरेखा होळीकट्टी, कालिदास वळसंगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुरत चेन्नई महामार्गासाठी शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या अत्यल्प मावेजाच्या नोटिसांची सामुदायिक होळी करण्यात आली. या बैठकीचे आयोजक शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर यांनी समृद्धी मार्ग किंवा बाजारभावाच्या पाचपट दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी शासनाच्या नोटिसा घेऊ नये व बलिदानास सज्ज राहावे असे आवाहन केले.   शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून शासनाच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला. पुढच्या आठवड्यापासून तालुक्यात उग्र आंदोलन  छेडणार असल्याचे बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.

या बैठकीस शेखर कुंभार, चेतन जाधव, सुभाष शिंदे, संजय जाधव, अमित काळे, अजय सुरवसे, वीरेश भंगरगी, जगदेवआप्पा कलमनी, मल्लिनाथ मैत्री, संजय सवळी, दीपक कदम, शंभुलिंग अकतनाळ, ज्ञानेश्वर पवार, नागनाथ सुलगडले आदि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर