त्यावेळी जगातील कोरोना महामारीचा नायनाट होऊन जागतिक शांतता, आनंद मिळावा, अशी स्वामी समर्थांना प्रार्थना करण्यात आली. यावेळी अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरापासून ते स्वामी समर्थ मठापर्यंत जयाद्री समर्थ पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण अक्कलकोट नगरी भंडाऱ्यात न्हाऊन गेली.
गेली कित्येक वर्ष जेजुरीच्या स्वामीमय सेवा ट्रस्टच्या वतीने जयाद्री स्वामीमय पादुकांची पदयात्रा आणि मोफत अन्नदानाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शासनाने सर्व यात्रा, उत्सवांवर बंदी घातल्यामुळे पायी पदयात्रा साजरी न करता शासनच्या सर्व अटी नियम पाळत भाविकाच्या सुरक्षित अंतर ठेवून जेजुरी कडेपठार येथून तेथील राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पादुका पूजन करण्यात आले.
गाडीने पादुकांचे प्रस्थान करीत शेकडो भाविकांना खंडोबाची तीर्थक्षेत्र जेजुरी ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची ब्रह्मांडनगरी अक्कलकोटपर्यंत मोफत बस आणि अन्नदान सेवा देण्यात आली होती. स्वामी समर्थ पादुका दर्शन घेत भाविकांनी समधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे पौरोहित्य नयन महाराज गुरुजी यांनी केले. यात्रा यशस्वी होण्यासाठी स्वामीमय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डिखळे, माउली खोमणे, समर्थ उपासक, गणेश मोरे, दिलीप दुबळे, गणेश दरेकर, संतोष मोरे, कबीर मोरे, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह सेवा ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
फोटोओळ ०१अक्कलकोट-खंडोबा
जेजुरी येथील पालखी अक्कलकोट निवासी दाखल होताच भंडाऱ्याने अवघी अक्कलकोट नगरी दुमदुमली.