शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहराध्यक्षपदासाठी अजितदादांचे तीन पर्याय इच्छुकांना मान्य; सोलापुरातील तिढा साेडविणार

By राकेश कदम | Updated: August 17, 2023 10:54 IST

शहराच्या राजकारणात ग्रामीण नेत्यांच्या शब्दाला महत्त्व

साेलापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या साेलापूर शहराध्यक्षपदाचा तिढा साेडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुकांना तीन पर्याय सुचविले. हे पर्याय मान्य असून अजित पवार जाे निर्णय घेतील त्यानुसार काम करू, असे मत संताेष पवार, किसन जाधव आण जुबेर बागवान गुरुवारी 'लाेकमत'कडे व्यक्त केले. साेलापूर शहराच्या या निवडीत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माेहाेळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

साेलापूर शहराध्यक्ष निवडीसाठी अजित पवारांनी बुधवारी मुंबईत बैठक घेतली हाेती. शहराध्यक्षपदासाठी संताेष पवार, किसन जाधव, जुबेर बागवान इच्छुक आहेत. तिघेही अजित पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. किसन जाधव हे तीन टर्म नगरसेवक हाेते. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने किसन जाधव यांनाच शहराध्यक्ष करावे अशी मागणी माेहाेळचे आमदार यशवंत माने यांनी अजित पवार यांच्याकडे केली हाेती. संताेष पवार, जुबेर बागवान यांनाही संघटनात्मक कामांचा अनुभव आहे.

त्यामुळे पवार आणि बागवान यांच्याकडे संघटनात्मक कामांचा जबाबदारी साेपवून जाधव यांच्याकडे राष्ट्रवादीने महापालिकेची जबाबदारी द्यावी असे मत पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे व्यक्त केले. मुंबईतील बैठकीला तिघेही हजर हाेते.. तुम्ही एकमत करा. इथेच निर्णय घेऊ, असे तटकरे म्हणाले हाेते. त्यावर सर्वजण गप्प बसले. तिघांपैकी एकाला शहराध्यक्ष, एकाला कार्याध्यक्ष, तर एकावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली तर कसे राहील?, असे अजितदादांनी विचारले हाेते. मुंबईतील बैठकीनंतर तिघेही गुरुवारी साेलापुरात पाेहाेचले. अजित पवार जाे निर्णय घेतील ताे आम्हाला मान्य आहे. आम्ही त्यांच्यासाेबत राहणार आहाेत. आजवर त्यांनी जे जे सांगितले त्यानुसार राजकारण केले असेही तिघांनी पत्रकारांना सांगितले.त्यामुळे दादा गटाचा अध्यक्ष काेण हाेणार याकडे लक्ष  लागले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस