सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने काही तास विमानतळ ते होम मैदानापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने पादचारी आणि वाहनधारकांना पर्यायी मार्ग दिले असून, त्या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मोदी यांचे होम मैदानावर शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता जाहीर सभा होणार असून, सभेच्या एक तास आधी त्यांच्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मोदी यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबर त्यांच्या दौऱ्यात कुठेही व्यत्यय येऊ नये, यासाठी २४ ठिकाणी बॅरिकेडिंग पॉर्इंट लावण्यात आले आहेत. त्यात मार्केट पोलीस चौकी ते समीर जनरल स्टोअर्स, वोरोनोको प्रशालेचा कॉर्नर, विश्रामनगर क्रॉस रोड, बालविकास मंदिर कॉर्नर, ट्रेझरी बँक, पंचकट्टा संपूर्ण बंद, नॉर्थकोट प्रशालेचे गेट, पूजा स्टेशनरी ते सिद्धेश्वर कन्या प्रशाला, शुभराय आर्ट गॅलरीसमोर, नवल पेट्रोल पंपासमोर, भाई छन्नुसिंह चंदेले सभागृह, विधाता बंगला (जुने झांबरे नर्सिंग होम), डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, चार हुतात्मा पुतळा चौक, पूनम चौक, डीआरएम कार्यालय, मसिहा चौक, पत्रकार भवन चौक, महाराणा प्रताप पुतळा, हुमा मेडिकल, कुमठे गाव, चर्च क्रॉस रोड आदींचा त्यात समावेश आहे. या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. -------------------------------इथे गाड्या पार्क करातुळजापूर रोडवरून येणाऱ्या वाहनांसाठी सिद्धेश्वर मंदिर, पंचकट्टा, तलावाशेजारील मैदानावर आणि सिद्धेश्वर शॉपिंग सेंटरसमोरील पार्किंग.अक्कलकोट आणि हैदराबाद रोडवरून येणाऱ्या वाहनांसाठी आदर्शनगर येथील मोकळ्या जागेत आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या समोरील मैदान, जुने होमगार्ड आणि नूतन प्रशाला मराठी शाळेसमोरील मोकळ्या जागेत पार्किंग.विजापूर रोड, मंगळवेढा रोडवरून येणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी पुतळ्यासमोरील रेल्वेचा जुना मालधक्का येथील पार्किंग.पुणे रोडवरून येणाऱ्या वाहनांसाठी चार हुतात्मा पुतळ्याच्या मागे असलेला जलतरणाचा परिसर आणि श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत पार्किंग.
विमानतळ-होम मैदान मार्ग बंद
By admin | Updated: August 15, 2014 00:31 IST