शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अहमद जकेरिया करणार विजापूर वेस चौक चकाचक; छत्रपती, बाबासाहेबांचा पुतळा परिसरही लख-लख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:54 IST

सोलापूर सिध्देश्वर यात्रा; प्रत्येक मार्ग घेण्याची एकेकाची जबाबदारी : छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळा परिसरातही विद्युत दिव्यांचा झगमगाट

ठळक मुद्देकधी नव्हे ती गेल्या वर्षापासून प्रकाशमय यात्रेची सुरुवात झालीसोलापूरच्या ब्रॅण्डिंगसाठी ‘लोकमत’ने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह यंदा ‘लोकमत’च्या दीपोत्सवात सहभागी होण्याचे पुण्य लाभले

सोलापूर: ग्राफिक डिझायनर असलेले अहमद जकेरिया यंदा विजापूर वेस चौकातील पोलीस पॉइंटजवळ भक्तगणांची सेवा बजावणार आहेत. स्वच्छता मोहिमेने परिसर चकाचक करण्याबरोबर भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करणार आहेत. नगरसेवक आनंद चंदनशिवे हे प्रबुद्ध भारत ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अन् महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर उजळून टाकणार आहेत. 

गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रेत विजापूर वेस परिसरातील अनेक व्यापाºयांनी योगदान दिले होते. यंदा आपले योगदान राहावे यासाठी  स्वागत कमानही उभी करणार असल्याचे जकेरिया यांनी सांगितले. गेल्या वर्षाप्रमाणे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी यंदाही प्रकाशमय यात्रेत पुढाकार घेतला आहे.

शहराच्या प्रवेशद्वारावरही विद्युत रोषणाई- जुना पुणे नाका म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा परिसर. पुण्याहून सोलापुरात येणारा प्रवेशद्वार म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. या परिसरातील छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा परिसर आणि सुशोभीकरण केलेल्या गार्डनमध्येही विद्युत दिव्यांचा झगमगाट दिसणार आहे. यासाठी पी. बी. ग्रुपने पुढाकार घेतल्याचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. इतर प्रभागातील नगरसेवकांनीही प्रकाशमय यात्रेत योगदान बजावावे, असे आवाहनही त्यांनी केले़ 

मार्कंडेय मंदिरावरही विद्युत रोषणाई- सुरेश फलमारीच्पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मार्कंडेय मंदिरासमोरुन मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने जात असतात. या नंदीध्वजांचे स्वागत पद्मशाली समाजाकडून केले जाते. गेल्या वर्षी श्री मार्कंडेय मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती. यंदाही मंदिर उजळून टाकणार असल्याचे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव सुरेश फलमारी यांनी सांगितले.  यंदा ‘लोकमत’च्या दीपोत्सवातही श्री मार्कंडेय जनजागृती संघाने घेतलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यंदा ‘लोकमत’च्या दीपोत्सवात सहभागी होण्याचे पुण्य लाभले. महालक्ष्मी दुग्धालय ते टोळांचा बोळपर्यंतच्या मार्गावरील दुतर्फा विद्युत रोषणाई करुन प्रकाशमय यात्रेला गती देणार आहे. मीही सहभागी झालो. आपणही व्हा.-अजित खाडिलकर,सराफ व्यापारी. 

कधी नव्हे ती गेल्या वर्षापासून प्रकाशमय यात्रेची सुरुवात झाली. सोलापूरच्या ब्रॅण्डिंगसाठी ‘लोकमत’ने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. फलटण गल्ली ते मंगळवार पेठ पोलीस चौकीपर्यंतचा मार्ग मी उजळून टाकणार आहे.-पापाशेठ दायमा, व्यापारी.

प्रकाशमय यात्रेची संकल्पना मांडत ‘लोकमत’ने जुन्या परंपरेला उजाळा दिला. प्रत्येक घटक सहभागी होत असताना आपणही मागे राहू नये, म्हणून मी हिरामोती चौक ते कस्तुरबाई मंडईपर्यंतचा मार्ग विद्युत दिव्यांनी सजवणार आहे.-प्रवीण शिरसी, व्यापारी. 

सोलापूर ही कष्टकरी, कामगारांची नगरी आहे. हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहत असताना ग्रामदैवताची यात्रा प्रकाशमय करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विजापूर वेस चौकातील पोलीस पॉइंटचा परिसर स्वच्छ करुन भक्तांसाठी पाण्याची सोय करणार आहे.-अहमद जकेरीया, ग्राफिक डिझायनर.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा