शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव, धनगर समाजाकडून जल्लोष; शिवा संघटनेने जाळली मुख्यमंत्र्यांची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 05:40 IST

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची धनगर समाजाची मागणी मान्य करण्यात आली असून तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली

नागपूर: सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची धनगर समाजाची मागणी मान्य करण्यात आली असून तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली. उपस्थितांनी ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष करीत घोषणेचे स्वागत केले. धनगर आरक्षण संघर्ष समितीने आयोजिलेल्या मेळाव्यात भाषणासाठी मुख्यमंत्री उभे राहिले असता, तरुणांनी ‘क्या हुआ तेरा वादा’ आणि ‘ये कहाँ आ गये हम’ ही हिंदी गाणी वाजवून त्यांना आरक्षणाच्या आश्वासनाची जाणीव करून दिली.मुख्यमंत्र्यांनीही ‘मी वादा विसरलेलो नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. त्यानुसार कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत याबाबतची शिफारस करू शकलो असतो. ठराव करून केंद्राकडे प्रस्ताव पाठविता आला असता. मात्र तो मान्य झाला नसता. संवैधानिक बाबींची पूर्तता करून लवकरच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

धनगर समाजाकडून जल्लोष; शिवा संघटनेने जाळली मुख्यमंत्र्यांची प्रतिमासोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात घोषणा करताच त्याचे सोलापूर शहरात संमिश्र पडसाद उमटले. धनगर समाजासह विविध राजकीय पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सिद्धेश्वरांच्या नावासाठी आग्रही असलेल्या शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळून आपला संताप व्यक्त केला.सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे ,या मागणीसाठी सोलापुरात धनगर समाजासह विविध राजकीय पक्षांनी महामोर्चा काढून निवेदन दिले होते. त्याचवेळी लिंगायत समाजानेही सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचे नाव देण्याची मागणी केली. यासाठी शिवा संघटनेचे मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे रिपाइं, शिवसेना, सकल मराठा समाज, राष्टÑवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षातील नेत्यांनी स्वागत केले. तर शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्टÑ अध्यक्ष वीरभद्रेश बसवंती यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी कोंतम चौकात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळली. तसेच सोलापूर-तुळजापूर रोडवर रस्ता रोको करुन आपला संताप व्यक्त केला.‘अहिल्यादेवींचे नाव विद्यापीठाला देताना वीरशैव लिंगायत समाजाला विश्वासात घ्यायला हवे होते. विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर अथवा सिद्धरामेश्वरांचे नाव देण्याची आमची मागणी जुनी होती,’ असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले.‘या संदर्भात शासनाने दोन्ही समाजाची बैठक बोलावायला हवी होती. त्यातून तोडगा निघू शकला असता. पण मुख्यमंत्र्यांनी एकतर्फी निर्णय घेतला. त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे. साहजिकच जागोजागी मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले जात आहेत. लवकरच समाजाची व्यापक बैठक बोलावून पुढील दिशा ठरवली जाईल,’ असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर