शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना अडवलं.. मंत्रीही बाहेरच; पहाटेच्या पूजेवेळी मानापमान नाट्य, मंदिराबाहेर धक्काबुक्की 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 09:40 IST

सुरक्षारक्षकांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे काही आमदार चिडले. कृषिमंत्र्यांनाही बाहेर थांबविले.

सोलापूर : गुरुवारी पहाटे विठ्ठल मंदिरात शासकीय पूजेदरम्यान मंदिराबाहेर ('श्री'चा नैवेद्य दरवाजा, क्रमांक-०८) राजकीय मानापमान नाट्य घडले. पूजेदरम्यान मंदिरात प्रवेश करण्यासाठी काही आमदारांची धडपड सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहपरिवारासह मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत मंदिरात घुसण्यासाठी अनेकजण धडपडले. सुरक्षारक्षकांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे काही आमदार चिडले. मंत्र्यांनाही बाहेर थांबविले.

मंत्री दादा भुसे यांचे आगमन झाले. दरवाजा बंद असल्याने आत आपल्याला प्रवेश मिळणार नाही, हे लक्षात येताच ते बाहेर गर्दीतच थांबून राहिले. यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली. परंतु ते कोणालाही काही बोलले नाहीत. मंत्री दादा भुसे हे बाहेर थांबून आहेत, असे काही लोकांनी सुरक्षारक्षकांना सांगितले. तरी त्यांचे लक्ष दादा भुसेंकडे गेले नाही. सात ते आठ मिनिटांनंतर सुरक्षारक्षकांनी दरवाजा उघडून दादा भुसे यांच्यासह काही लोकांना घेतले.

गुरुवारी मध्यरात्री दीडचे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या परिवारासह विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. या दरम्यान संपूर्ण मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. मंत्री, आमदार तसेच अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. याच दरम्यान काही लोकांनी मंदिरात येण्यासाठी खूप धडपड केली. यावेळी आत येणारे नागरिक तसेच पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली.

पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी मंदिरातच थांबून होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा स्ट्रॉंग राहिली. मुख्यमंत्री आत शासकीय पूजा करत असताना मंदिरात जाण्यासाठी अनेक लोकांकडून प्रयत्न सुरू होते. परंतु, पोलिस विभागाने काही मोजक्याच आजी-माजी मंत्र्यांना, आमदार तसेच नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला. बाकीचे दरवाजाबाहेर थांबून राहिले. त्यामुळे गेट क्रमांक आठच्या बाहेर गर्दीच गर्दी होती. या ठिकाणी धक्काबुक्कीदेखील झाली. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मंदिरातील दरवाजा बंद केल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांना बाहेरच थांबून राहावे लागले होते.

पालकमंत्र्यांनी घेतली भाविकांची काळजीपालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे बराचवेळ गेट बाहेर थांबून राहिले. गर्दी कमी करण्यासाठी ते भाविकांना आवाहन करत होते. मंदिर परिसरातून ये-जा करणाऱ्या वारकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. गर्दीत घुसणाऱ्या व गर्दीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांना ते शांततेचे आवाहन करत होते. 'हळू चला, काळजी घ्या, समोर पायऱ्या आहेत, पडाल...' अशा सूचना देत त्यांनी भाविकांची काळजी घेतली. एकीकडे मंदिरात घुसण्यासाठी सर्वजण धडपड करत होते तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनी मंदिराबाहेर थांबून भाविकांची काळजी घेतली. त्यांच्या या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले.

टॅग्स :PandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी