आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील ‘आपलं सरकार‘पोर्टलवरील पात्र लाभार्थ्यांची नावे अद्यापही गायबच असून तीन दिवसांपासून याद्या नसल्याने कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तीन महिन्यांपूर्वी राज्यातील शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे जाहीर केले होते. दिवाळी अगोदरच कर्जमाफी होईल असे सांगत तशी बँकांकडून माहितीही मागविली होती. शेतकºयांकडून आॅनलाईन आलेल्या अर्जांची लेखापरीक्षकांकडून तपासणी करून कर्जमाफीसाठी शासनाच्या पोर्टलवर ही माहिती अपलोडही केली होती. दिवाळी अगोदर कर्जमाफी होणार असे ठासून सांगणाºया मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांनी कर्जमाफी झाल्याचे प्राथमिक स्वरुपात सन्मान सोहळेही घेतले. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. दिवाळीनंतर कर्जमाफीची पहिली ८ लाख ४० हजार शेतकºयांची यादीच पोर्टलवरुन काढण्यात आली आहे. दुरुस्तीसाठी एखादा दिवस लागेल असे सोमवारी सांगितले होते; मात्र बुधवारीही पोर्टलवर शेतकºयांची यादी टाकण्यात आली नाही. शासनाच्या अर्थविभागाकडून कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या खात्यावर वर्ग केल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात कर्जमाफ झालेल्या शेतकºयांची पहिली यादीच गायब आहे. अगोदरच विरोधी पक्ष, सामाजिक संघटना व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी कर्जमाफी फसवी असल्याचे वारंवार सांगितले गेले आहेच, याचा शासनाच्या बेफिकीर कारभारामुळे अधिक बळ मिळाले आहे. ----------------अद्ययावत याद्या एक-दोन दिवसात ‘आपलं सरकार’पोर्टलवर टाकल्या जातील. कर्जमाफीसाठी चार हजार कोटी इतकी रक्कम सहकार खात्याकडे जमाही आहे. कर्जमाफीचे काम अतिशय पारदर्शक होईल.- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
कर्जमाफी योजनेबाबत शेतकºयांचा संभ्रम वाढला, शासनाकडून ठोस असे उत्तर मिळेना..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:50 IST
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील ‘आपलं सरकार‘पोर्टलवरील पात्र लाभार्थ्यांची नावे अद्यापही गायबच असून तीन दिवसांपासून याद्या नसल्याने कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
कर्जमाफी योजनेबाबत शेतकºयांचा संभ्रम वाढला, शासनाकडून ठोस असे उत्तर मिळेना..!
ठळक मुद्दे‘आपलं सरकार‘पोर्टलवरील पात्र लाभार्थ्यांची नावे अद्यापही गायबच कर्जमाफीसाठी चार हजार कोटी इतकी रक्कम सहकार खात्याकडे जमाशासनाच्या अर्थविभागाकडून कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपये