शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

वयाच्या अठराव्या वर्षी राजुरीचा किशोर जाधव झाला मृदंग विशारद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:12 IST

ख्यातनाम कीर्तनकारांच्या कीर्तनात त्याच्या पखवाजाचा निनाद संपूर्ण महाराष्ट्रात घुमतो

ठळक मुद्देराजुरी हे गाव करमाळा शहरापासून २७ किलोमीटर आणि उजनी बॅकवॉटरपासून ८ किलोमीटर अंतरावरगावात सिंचन क्षेत्र मर्यादित आहे़ येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात़जेमतेम अडीच एकर शेतजमिनीवर या गावातील शेतकरी गजानन जाधव यांची उपजीविका आहे

सुरेश साखरेकोर्टी : करमाळा तालुक्यतील राजुरी या छोट्याशा गावातील कि शोर जाधव या शेतकरी पुत्राने पखवाज वादनात आपला ठसा उमटवला आहे. तो नुकताच मृदंग विशारद परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. ख्यातनाम कीर्तनकारांच्या कीर्तनात त्याच्या पखवाजाचा निनाद संपूर्ण महाराष्ट्रात घुमतो आहे.

राजुरी हे गाव करमाळा शहरापासून २७ किलोमीटर आणि उजनी बॅकवॉटरपासून ८ किलोमीटर अंतरावर आह़े गावात सिंचन क्षेत्र मर्यादित आहे़ येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात़ जेमतेम अडीच एकर शेतजमिनीवर या गावातील शेतकरी गजानन जाधव यांची उपजीविका आहे़ ही जमीन उजनी बॅकवॉटरपासून लांब असल्याने सिंचनाची सोय नाही. मात्र घरातील वातावरण संप्रदायाचे. याच वारकरी संप्रदायाने मृदंग विशारद अशी ओळख निर्माण करून दिली आहे़

त्याचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जि़ प़ शाळेत झाले़ त्याला लहानपणापासून वादनाची आवड होती़ त्याचे वडील गजानन जाधव यांनाही वादनाची आवड, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही कला जोपासता आली नाही़ स्वत:ची अपूर्ण इच्छा आपल्या मुलाच्या रूपाने पूर्ण व्हावी, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला बीड जिल्ह्यात लिंबा गणेश येथील मृदंग सम्राट पंडित केशव जगदाळे यांच्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये ठेवले़ त्यानंतर तेथील अभ्यास पूर्ण करून त्याने मुंबई येथे गांधर्व महाविद्यालयात परीक्षा देऊन मृदंग विशारद ही पदवी प्राप्त केली़

परराज्यातील सादरीकरणाने दिले व्यासपीठ आज तो राज्यातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनात पखवाजवर साथ देत आह़े याबरोबरच त्याने धृपवादन व सोलोवादनात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे़ किशोरने आजपर्यंत इंदोरीकर महाराज, ढोक महाराज, इंगळे महाराज यांना कीर्तनात साथ केली आहे़ याबरोबरच त्याने परराज्यातही आपल्या वादन सादरीकरणातून ठसा उमटवला आहे़ व्यासपीठावर येण्यासाठी यातून त्याला खूप मोठी संधी उपलब्ध झाली़ 

टॅग्स :Solapurसोलापूर