शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर गाठावी लागेल थेट कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 23:35 IST

वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाण होण्याच्या घटना घडल्यानंतर ग्राहकांवर गुन्हा दाखल केला जातो.

सोलापूर : वीजबिलाची थकबाकी वसुली, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे, वीज मीटर काढल्यानंतर अभियंते व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करण्याच्या घटना घडल्या. वीजचोरी शोध मोहीम, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर अनधिकृत अथवा चोरट्या मार्गाने चोरट्या पानि गजपुरवठा सुरू आहे प्रकार सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात घडले आहेत.

वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणकडून ग्राहकांना थकीत वीज बिल भरण्यासाठी सातत्याने आवाहन केले जाते. एखाद्या महिन्याचे बिल भरलेले नसल्यास पहिल्यांदा ग्राहकाला बिल भरण्याचा मेल, मेसेज केला जातो. दुसऱ्यांदा वीज तोडण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतरही बिल न भरल्यास तिसऱ्यांदा वीजजोडणी तोडण्यासह मीटर जप्तीची कारवाई केली जाते. बिल पूर्ण भरल्यानंतरच पुन्हा जोडणी दिली जाते. मात्र, या प्रक्रियेत कारवाई करण्यासाठी दाखल वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाण होण्याच्या घटना घडल्यानंतर ग्राहकांवर गुन्हा दाखल केला जातो.

तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाईसाठी उच्च स्तरावरून व विधी विभागाकडून पाठपुरावा करण्यात येतो. कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की प्रकरणांत आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. विविध कलमांनुसार दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

काय होते कारवाई ?पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांकडून सरकारी कामात अडथळा तत्कालिन भारतीय दंड संहितेच्या ३५३ या कलमासह घटनेच्या अनुषंगाने तक्रार दिली जात होती. आता भारतीय न्याय संहिता बीएनएस कलमान्वये तक्रार देण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत कारवाई केली जाते.

पाठपुरावा अन् संघटना होतात आक्रमकमारहाण, दमदाटी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दिल्यास त्या घटनांमध्ये आरोपींविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. कर्मचारी संघटनाही कारवाईसाठी भूमिका घेतात. घटनांबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. अपवाद वगळता सर्व प्रकरणांमध्ये अटकेची कारवाई होते.

टॅग्स :Solapurसोलापूर