शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसानंतर अखेर सोलापूर परिवहन कर्मचाºयांचा संप मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 10:52 IST

सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांचा एक महिन्याचा पगार मंगळवारी रोखीने तर उर्वरित एका महिन्याचा पगार पाच दिवसांत देण्याचे ...

ठळक मुद्देमहापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांचा एक महिन्याचा पगार मंगळवारी रोखीने तर उर्वरित एका महिन्याचा पगार पाच दिवसांत देण्याचे आश्वासनमहापालिका प्रशासनाकडून अ‍ॅडव्हान्सचा चेक आल्यानंतर चार दिवसांत दुसरा पगार करु, असे आश्वासन पदाधिकाºयांनी कामगारांना दिलेपगार मिळाल्यानंतर सिटी बस डेपोमधून बाहेर काढू, असे कामगारांनी जाहीर केले. 

सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांचा एक महिन्याचा पगार मंगळवारी रोखीने तर उर्वरित एका महिन्याचा पगार पाच दिवसांत देण्याचे आश्वासन महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी यांनी दिले. पण मंगळवारी पगार मिळाल्यानंतर सिटी बससेवा सुरू करू, असा पवित्रा कामगारांनी घेतला. त्यामुळे उद्या दुपारपासून सिटी बससेवा पूर्ववत होईल, असा विश्वास परिवहन व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला. 

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थकीत पगार मिळावा या मागणीसाठी परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनी २१ जानेवारीपासून संप सुरू केला होता. परिवहन उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. कर्मचाºयांच्या पगारासाठी महापालिका प्रशासनाने अंध, अपंग आणि विद्यार्थिनींना देण्यात येणाºया मोफत पासच्या प्रवासाच्या बिलाचे अ‍ॅडव्हान्स रक्कम देण्यात यावी, अशी मागणी परिवहन समितीकडून करण्यात येत आहे.

समितीचे सभापती तुकाराम मस्के, नगरसेवक राजकुमार हंचाटे यांच्यासह परिवहन समितीच्या सदस्यांनी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची तीन-चार वेळा भेटही घेतली,परंतु महापालिकाच आर्थिक अडचणीत असल्यामुळे अ‍ॅडव्हान्स देता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सिटी बससेवा ठप्प असल्याने शहरासह परिसरातील ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत.  गेल्या १५ दिवसांपासून संपावर असलेल्या परिवहन कामगारांनी मंगळवारी भीक मांगो आंदोलनाचा इशारा दिला.

काँग्रेस, बसपाच्या गटनेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन महापालिकेवर हल्लाबोल करण्याचा इरादा व्यक्त केला होता. यादरम्यान, महापौर शोभा बनशेट्टी, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, सभागृह नेते संजय कोळी, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांची महापौर कक्षात बैठक झाली. कर्मचाºयांचा एक महिन्याचा पगार करता येईल इतके पैसे प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी पदाधिकाºयांनी केली. आयुक्तांनी तयारी दाखविल्याची माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. यानंतर सर्व पदाधिकारी सात रस्ता येथील बसडेपोमध्ये जमले. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे येथे पोहोचले.

मंगळवारी एक महिन्याचा पगार करण्यात येईल. महापालिका प्रशासनाकडून अ‍ॅडव्हान्सचा चेक आल्यानंतर चार दिवसांत दुसरा पगार करु, असे आश्वासन पदाधिकाºयांनी कामगारांना दिले. उद्या पगार मिळाल्यानंतर सिटी बस डेपोमधून बाहेर काढू, असे कामगारांनी जाहीर केले. 

आम्हाला मंगळवारी पगार मिळाला तर आम्ही संप मागे घेण्यास तयार आहोत. मागच्या काळात अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु ते पूर्ण करण्यात आले नव्हते. मंगळवारी पगार मिळाला की सिटी बस बाहेर पडतील. संपाच्या काळात ११ कर्मचाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी आम्ही करीत आहोत. -देविदास गायकवाड, सदस्य, परिवहन कर्मचारी संघर्ष समिती.

महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सिटी बससेवा ठप्प असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. गेली आठवडाभर आम्ही शासकीय कार्यक्रमांमुळे बाहेरगावी होतो. त्यामुळे कामगारांशी चर्चा करता आली नाही. पण मंगळवारी त्यांना बिल दिले जाईल. परिवहन व्यवस्थेत काही अप्रामाणिक कामगार आहेत. त्यांच्यामुळे ही संस्था कायमची बंद होऊ शकते. भ्रष्टाचार करणाºया कर्मचाºयांना आळा घातला पाहिजे. -शोभा बनशेट्टी, महापौर

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBus Driverबसचालक