शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातून आल्याने शेजाºयांनी हाकलले.. ‘ती’ च्या मदतीला पोलीस धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 13:17 IST

पंढरपुरात महिलेला विदारक अनुभव: खाकी वर्दीने केली तनपुरे मठात राहण्याची सोय

ठळक मुद्देमुंबई, ठाणे, पुणे व सोलापूर अशा रेड झोन भागातून नागरिक आल्यास आजूबाजूचे नागरिक घाबरत आहेत नागरिकांनी चिंतीत न होता प्रशासनाला कळवावे, बाहेरुन आलेल्या लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात येणार आहेसोलापूरहून पंढरपुरात आलेल्या महिलेला तिच्या घरी राहण्यास परिसरातील नागरिक विरोध करत असल्याचे पाहून पोलीस तिच्या मदतीला धाऊन आले

सचिन कांबळे

पंढरपूर : सोलापूर शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. यामुळे सोलापूर शहरातून ग्रामीण भागामध्ये येणाºया नागरिकांकडे संशयाने पाहण्याची वृत्ती वाढली आहे. सोलापुरातून पंढरपुरात आलेल्या एका महिलेला ती राहत असलेल्या परिसरातील नागरिकांनी तिच्या घरात प्रवेश करु दिला नाही; मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तिची राहण्याची सोय एका मठामध्ये केली आहे. यामुळे ज्यांना कोणी नाही, त्यांना प्रशासन आहे, अशी प्रचिती या निमित्ताने आली. 

पंढरपुरातील एक ४८ वर्षीय महिला सोलापूर येथे गेली होती. लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून सोलापुरातच अडकून पडली होती. वाहनाची सोय होताच, ती पंढरपूरला परतली. शहरात आल्यानंतर तिने उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणी करुन घेतली. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांनी तिला घरी अलगीकरणात राहण्यास सांगितले.

ती घरी जात होती. यावेळी घराजवळील नागरिक जमले, त्यांनी तिला त्या ठिकाणी राहण्यास विरोध केला. त्याचबरोबर काहीजण तिच्यावर चवताळून आले.  नेमके याचवेळी त्या परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस हवालदार अरुण रासकर व सतीश सर्वगोड यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेले. यानंतर संबंधित महिलेची चौकशी केली. मात्र ती रेड झोन भागातून आल्याने तिला राहू देण्यास कोणी तयार होत नसल्याचे लक्षात आले.त्यावेळी पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी डॉ. सागर कवडे, प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी संबंधित महिलेला श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये राहण्याची सोय केली. त्याठिकाणी तिला १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिच्या जेवणाची देखील सोय करण्यात आली आहे. त्या महिलेला स्वत:चे घर असूनही तिच्यावर मठामध्ये राहण्याची वेळ आली आहे. यामुळे ज्याला कोणी नाही. त्याला प्रशासन आहे, असे दिसून आले.

पोलिसांच्या मदतीने डोळे पाणावले- सोलापूरहून पंढरपुरात आलेल्या महिलेला तिच्या घरी राहण्यास परिसरातील नागरिक विरोध करत असल्याचे पाहून पोलीस तिच्या मदतीला धाऊन आले. तिला श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये नेऊन तेथे तिची सोय केली. त्याचबरोबर तिच्या नातेवाईकांना बोलावून तिला दररोज जेवणाची सोय करा, अशा सूचना दिल्या. या खाकी वर्दीतील माणुसकीमुळे त्या महिलेचे डोळे पाणावले. 

मुंबई, ठाणे, पुणे व सोलापूर अशा रेड झोन भागातून नागरिक आल्यास आजूबाजूचे नागरिक घाबरत आहेत. नागरिकांनी चिंतीत न होता प्रशासनाला कळवावे. बाहेरुन आलेल्या लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही.- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस